नागपूर :- नागपुरचा चेहरामोहरा बदलून नागपुरचा विकास करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत त्यांना नागपुरचा कलंक म्हणणारे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या विरोधात आज व्हेरायटी चौक नागपूर, येथे भाजपा नागपुर महानगराच्यावतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजयुमो कडुन झाशीराणी चौकातुन उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्यांसोबत परिसरातील नागरिकांनी देखील ‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ म्हणुन नारे देऊन रोष व्यक्त केला.
उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री यांना अडीच वर्ष सत्तेत असताना अर्धा दिवस सुद्धा विदर्भात यायला जमलं नाही, ना कधी विदर्भासाठी काही करावं असं वाटलं. आणि आता अचानक विदर्भाचा पुळका आला आहे. एवढा की काल नागपूरमध्ये येऊन नागपूरच्या विकासपुरुषाला ‘कलंक’ म्हणायची हिंमत झाली अशी प्रतिक्रीया यावेळी भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसाठी काय काय केलंय, किती खस्ता खाऊन नागपूरचा विकास केलाय, करतायत, हे इथला बच्चा बच्चा जाणून आहे. आणि म्हणूनच आज त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे. पण तुम्हाला ते कधीच कळणार नाही. कारण कावीळ झालेली असताना जसं सगळं जग पिवळं दिसतं तसं स्वतः कलंक असताना समोरचे पण कलंकच दिसतात.
उद्धव ठाकरे कलंक आहेत ज्यांनी माझी मुंबई, माझी मुंबई करत ज्या मुंबईची लूट केली.. ते कलंक आहेत ज्यांनी फक्त नाव वापरून मतं मिळवली आणि नंतर स्वार्थ साधण्यासाठी लाचारी पत्करली. उद्धव ठाकरे कलंक आहेत ज्यांनी स्वतःच्या वडिलांच्या विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरे कलंक आहेत ज्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली अशी प्रतिक्रीया यावेळी माजी महापौर व उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांनी दिली.
जर उद्घव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जर माफी मागतली नाही तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनाला प्रामुख्याने माजी खासदार विकास महात्मे, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी महापौर व मानद सचिव उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य संदीप जोशी, भाजपा पुर्व विदर्भ विभागीय संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, माजी आमदार मिलिंद माने, प्रदेश मंत्री धर्मपाल मेश्राम, प्रदेश मंत्री अर्चना डेहनकर, शहर महामंत्री रामभाऊ आंबूलकर, संजय बंगाले, शहर संघटनमंत्री विष्णू चांगदे, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, प्रदेश महिला मोर्चा महामंत्री अश्विनी जिचकार, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष अरविंद गजभिये, भाजपा मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे, किशोर वानखेडे, देवेन दस्तुरे, संजय अवचट, किशोर पलांदुरकर, संजय चौधरी, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, आदर्श पटले, वर्षा ठाकरे, मनिषा कोठे, मनिषा काशीकर, परिणीता फुके, सोनाली कडु, पल्लवी शामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, जोत्सना कुर्हेकर, दिपांशु लिंगायत, सचिन करारे, कल्याण देशपांडे तसेच शहराचे व मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.