कामठीत गुरूपुजा आणि भव्य शाहिर कलाकारांचा मेळावा

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

-लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे (गुरूजी) यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य मेळाव्याचे आयोजन.

-ज्येष्ठ शाहिर, पत्रकार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार

कामठी : – भारतीय कलंगी शाहीर डहाका मंडळ कामठी आणि भारतीय कलाकार शाहीर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ,जय संताजी नाऱ्याचे जनक , लोकशाहीर वस्ताद स्व.भीमराव बावनकुळे (गुरुजी) यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुरूपुजा आणि भव्य शाहीर कलाकारांचा मेळावा श्रीराम जानकी मंगल कार्यालय राम मंदीर ,मच्छीपुल,कामठी येथे (दि.१४) जुलै ला आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षी प्रमाणे गुरूवार (दि.१४) जुलै ला सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत जय संताजी नाऱ्याचे जनक, लोकशाहीर वस्ताद स्व. भीमराव बावनकुळे (गुरूजी) यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुरूपुजा आणि शाहीर कलाकारांचा मेळाव्याचे अध्यक्ष शाहीर बहादुल्ला बराडे, विदर्भ प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे, उदघाटक चंद्रशेखर बावनकुळे आमदार, माजी उर्जा, उत्पादक शुल्क मंत्री व पालकमंत्री नागपुर जिल्हा यांचे हस्ते उदघाटन करण्यात येईल.याप्रसंगी प्रमुख अतिथी कुपाल तुमाणे खासदार रामटेक,  टेकचंदजी सावरकर आमदार कामठी-मौदा, राजेंद्र मुळक माजी मंत्री व अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रा. कॉग्रेस कमेटी, अजय अग्रवाल, देवराव रडके, हुकुमचंद आमधरे, राधेश्याम हटवार, राजाभाऊ हिंदुस्थानी, संदीप इटकेलवार तर विशेष अतिथी डाॅ.दिपक खिरवडकर, डायरेक्टर दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, कवी ज्ञानेश्वर वांढरे, योगेश वाडीभस्मे, डाॅ. संदीप कश्यप, प्रा.मनिष वाजपेयी,विवेक मंगतानी, संजय कनोजिया, राजेश खंडेलवाल, राजन सिंग आदीची प्रामुख्याने उपस्थि ती राहणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ शाहीर,पत्रकार आणि शाहीर कलाकारांच्या परिवारातील दहावी व बारावी च्या गुणवंत विद्याथ्यांचा विशेष सत्कार कर ण्यात येईल. या मेळाव्यास बहु संख्येने शाहीर, लोक कलावंत, कलाकारांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन मा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद नागपुर शाहीर राजेंद्र भिमराव बावनकुळे यांनी केले आहे. मेळाव्याच्या यशस्विते करिता शाहीर ब्रम्हा नवघरे, शाहीर अरूण मेश्राम, शाहीर राजेंद्र लक्षणे, शाहीर भगवान लांजेवर, शाहीर भुपेश प्रभाकर बावनकुळे, विक्रम वांढरे, दशरथ भडंग, चिरकुट पुंडेकर, मोरेश्वर बडवाईक, गजानन वडे, नरेंद्र महल्ले, विरेंद्रसिंग शेंगर, लिलाधर वळांद्र,चरणदास कापसे, फागोजी इरपाती, भुपेश बावन कुळे, शंकर भडंग, जितेंद्र अतकरे, प्रफुल भनारे, रविंद्र मेश्राम, युवराज अडकणे, गिरीधर बावणे, दिपक दिवटे , महादेव पारसे आदीनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू

Sun Jul 10 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदा येथील तिथदास बालचंद पारधी हे शेतात रोहिणी काम करित असताना बैलजोडी व दतार घेऊन शेतातील दुसऱ्या बाधित नेत असताना अचानक विज कडाडल्याने ती वीज बैल जोडी वर पडल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाले आहे. सदर घटना दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच तिरोडा तहसीलदार प्रशांत घोरूडे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!