कोदामेंढी :- नि:स्पृह शिक्षण संस्था निमखेडा द्वारा संचालित श्री. साईबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि श्री साईबाबा स्कूल ऑफ लर्नर्स निमखेडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम व प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
दिनांक 25 जानेवारीला स्नेहसंमेलन निमित्ताने कार्यक्रमाचे उद्घाटन अर्थ-नियोजन व विधी व न्याय राज्य मंत्री तथा सह पालकमंत्री गडचिरोली एडवोकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव द. कुलर एज्युकेशन सोसायटी नागपुर ज्ञानेश्वर लोहकरे ,प्रमुख उपस्थिती माजी सभापती मनोज कोठे, माजी महिला व बालकल्याण सभापती नंदा लोहबरे, माजी उपसभापती ज्ञानेश्वर चौरे, सरपंचा निमखेडा सुनिता यागंटी,उपसरपंच मनोज झाडे, सुरेंद्र हटेवार उपाध्यक्ष, नि:स्पृह शिक्षण संस्था निमखेडा सुरेंद्र हटेवार , अखाडनाथ नानोटकर, सचिव नि:स्पृह शिक्षण संस्था निमखेडा अखाडनाथ नानोटकर, कोषाध्यक्ष सुनील ठाकरे, , नि:स्पृह शिक्षण संस्था निमखेडा, माजी सरपंच प्रमोद बरबटे, प्रकाश पल्लेवार, श्रीनूजी यागंटी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक तसेच परिसरातील धनी, वीरसी, बानोर, भेंडाळा, पारडीकला, तूमान, बार्शी- दुधाळा या गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते सर्व मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
ना.आशिष जयस्वाल यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर लक्ष देण्याचे तसेच निमखेडा येथे रेल्वे अंडर ब्रिज मुळे होणारी समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.
दिनांक 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रम शिरीष वीरगंधम ,सुरेंद्र हटेवार ,यांच्या शुभहस्ते पार पडला .दुपारी आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण व स्नेहसंमेलनाचा समारोपिय कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक़ अरोली स्नेहल राऊत, प्रमुख पाहुणे समुपदेशक पोलीस स्टेशन मौदा वैशाली चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी रामेश्वर भक्तवरती, सामाजिक कार्यकर्ते विनायकराव महादुले, भिमराव महादुले, ईश्वर पिसे, गंगाधर बेलेकर, विनायकराव घाटबांधे , सुनील नटीये तसेच मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मंगेश बोरकर व आभार प्रदर्शन रवींद्र गोयले यांनी केले .कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आकाश निनावे, शिक्षक सर्व भुजाडे, पत्रे, आरिकर, सय्यद ,तिजारे वैद्य ,शुभम झाडे ,बोंद्रे,राऊत, नानोटकर ,मरसकोल्हे ,गजभिय ,नटीये, महादुले ,आस्वले, पायल ठाकरे आणि शिक्षककेतर कर्मचारी रंगारी , पुंड, नानवटकर यांनी अथक प्रयत्न केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.