१०००० रु. चा मुद्देमाल अज्ञात चोराने केला लंपास

पो.स्टे. अरोली :- अंतर्गत ०१ कि.मी. अंतरावरील मौजा अरोली येथे दिनांक २९/०४/२०२३ ते दिनांक ३०/०४/२०२३ चे रात्री १२ चे सुमारास स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम एच ४० / बी. जे. ३९१९ तसेच रामकृष्ण वाडीभस्मे यांचा ट्रॅक्टर क्र. एम. एच. ४० / ए. एम.- ११९५ तसेच प्रशांत भुरे यांचा ट्रॅक्टर क्र. एम. एच. -४० पी. एच.- ५८८५ तसेच जागेश्वर नत्थु हटवार यांचा ट्रॅक्टर क्र. एम एच ४० / सी. ए. ८०१३ असा असुन याचे ट्रॅक्टर रामकृष्न वाडीभस्मे यांचे घरा समोर खाली जागा असल्याने ठेवले होते. दिनांक २९/०४/२०२३ ते ३०/०४/२३ वे रात्री (१) स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम एच ४० बी. जे. ३९१९ ची बॅटरी किंमती अंदाजे ३०००/-रु (२) ट्रॅक्टर क्र. एम एच ४० ए. एम १९९५ ची बॅटरी किमती अंदाजे ३०००/-रु, (३) ट्रॅक्टर एम एच ४० पी एच ५८८५ ची बॅटरी किंमती अंदाजे २०००/-रु. (४) ट्रॅक्टर क्र. एम एच ४० / सी. ए ८०१३ ची बॅटरी किमती अंदाजे २०००/-रु असा एकुण १०००० रु. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. अरोली येथे आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादवी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोना ईंगळे व नं. ८०६ पोस्टे अरोली मो. नं. ७६६६०९५२०४ है। करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com