नागपूर :-दिनांक १०/०८/२०२३ रोजी कळमेश्वर पोलीसांना मुखरबिरद्वारे गोपनिय माहीती मिळाली की, गोंडखैरी येथील गोडाउन परीसरात राहणारा इसम नामे प्रविण पटेल हा त्याचे जवळ नकली नोटा बाळगून बाजारात चलनात आणत आहे. त्यावरून खबरेची शहानिशा करणे करीता कळमेश्वरचे दाणेदार यशवंत सोलसे यांनी स्टाफसह गोडखैरी येथे जावुन प्रविण पटेल यांची माहीती घेतली १) प्रविण रामजी पटेल, वय २१ वर्षे, रा. घर क्र. २८, वार्ड क्र. ०२, पिपरहा पोस्ट बिटौली, ता. सिहाओल, जि. सिंधी (म.प्र) हा एका विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत गौंडखोरी येथे मिळून आला. पोलीसांनी पंचासमक्ष त्यांची अंग झडती घेतली असता त्याचे जवळ १००/- रू. च्या नविन नोटा 7BK 213234 या एकाच सिरीजच्या तसेच १०० रु. दराच्या जुण्या नोटा JKR185020 या एकाच सिरीज एकूण ४८.७००/- रूपये मिळून आले. संपूर्ण नोटांची पाहणी केली असता नविन नोटा हया एकाच सिरीजचे व जुन्या नोटा हया सुद्धा एकाच सिरीज व क्रमांकाचे असल्याने सदर दोन्ही ईसमाविरुद्ध पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे अप. नं. (६८६ / २३ कलम ४८९ (ब), (क) भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
सदर गुन्हयाचे गार्भीय लक्षात घेता नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर प्रकरणी समांतर तपास करण्याकरीता निर्देश दिले. त्यावरून कळमेश्वर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळून गुन्हयाचा तपास सुरु केला. सदर गुन्हयाचे कनेक्शन हे मध्यप्रदेश येथील सिवी जिल्हयातील विरण: तिवारी आणि आकाश पाण्डेय या दोन इसमांशी असल्याचे पुरावे पोलीसांचे हाती लागले. कळमेश्वर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सतत ०२ दिवस मध्यप्रदेश येथील सिमी जिल्हयात राहुन वरील दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता आरोपी धिरज दिनेश तिवारी, वय २८ वर्ष, रा. ग्राम डागा, तह, अमरपाटन, पो.स्टे. रामनगर, जि. सतना (मध्यप्रदेश) ह. मु. पवित्र कॉलोनी, नविन बस स्टैंड जवळ, सिधी (मध्यप्रदेश) आणि आरोपी आकाश अन्नपुर्णाप्रसाद पाण्डेय, वय २१ वर्ष रा. ग्राम चांदवाही तह बहेरी जि. सिंधी (मध्यप्रदेश) यांना सिधी जिल्हयातून रात्री उशिरा ताब्यात घेतले.
आरोपी आकाश पाण्डेय हा उच्चशिक्षीत असून त्याने कम्प्युटर इन डिप्लोमामध्ये शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्याला संगणकाचे उत्तम प्रकारचे ज्ञान आहे. आकाश याला ऑनलाईन गेमींग जुगार खेळण्याचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वी आकाश हा सक्सेस अॅप व कलर विंझी या ऑनलाईन गेमींग खेळामध्ये सुमारे १,५०,०००/- रुपये हरला होता. त्यामुळे त्याला पैश्याची आवश्यकता होती. अश्यातच त्याची भेट निरज तिवारी यांचेसोबत झाली होती. धिरज तिवारी याने त्याला बनावटी नकली चलनी नोटा संगणकावर तयार करण्याची योजना सांगीतली. याकामाकरीता आकाश याला ३० टक्के कमिशन मिळणार होते. त्यावरून आकाश पाण्डेय याने १०० /- रुपये दराच्या बनावटी नकली चलणी नोटा तयार करून धिरज तिवारी याचेजवळ दिल्या होत्या. सदर बनावट नोटा मार्केटमधील व्यवहारात चलनामध्ये आणण्याकरीता धिरज तिवारी याने प्रविण पटेल व त्याचा विधी संघर्षग्रस्त बालक मित्र या दोघाना तयार केले व त्या दोघाना नागपूर येथे बनावट नकली चलनी नोटा सह पाठविले असल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. नागपूर ग्रामीण पोलीसांचे उत्तम कामगिरीने वरील गुन्हा व गुन्हयाशी संबंधीत मध्यप्रदेश येथील आरोपी यांचा छाडा लावण्यात मोठे यश आले आहे.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी बापू रोहाम विभाग सावनेर, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, कळमेश्वरचे दाणेदार पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, पोलीस सहा. निरीक्षक दिलीप पोटभरे, राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार दिनेश आधापूरे पोहवा अतुल शेंडे, पोलीस शिपाई हितेन्द्र चौधरी, अशोक चौधरी, प्रदिप सरोदे, निलेश इंगुलकर यांचे पथकाने पार पाडली.