दीक्षाभूमीवर चार दिवसीय बुद्ध महोत्सव

-शंभर बालकांना श्रामणेरची दीक्षा

-भदन्त सुरेई ससाई यांची माहिती

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे चार दिवसीय बुद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बुद्धजयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (4 मे) सायंकाळी 6 वाजता शंभर बालकांसह ज्येष्ठांनाही श्रामनेरची दीक्षा दिली जाणार आहे, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेनानायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

या कार्यक्रमाला बुध्दीस्ट सेमिनरीचे प्रमुख भदन्त धम्मसारथी, भंते नागसेन थेरो, संघप्रिया महाथेरो, भंते धम्मबोधी, भंते भीमा बोधी उपस्थित राहतील. समारंभात उपस्थित लहानथोर अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर आयुष्यभर दहा शीलांचे पालन करण्याचे व्रत घेतील. श्रामणेर दीक्षा घेऊन तथागत बुद्धांचा धम्म अनुसरण्याचा निर्धार करतील. श्रामणेर यांचे निवासी प्रशिक्षण दीक्षाभूमी स्मारक समितीच्या उंटखाना शाखेतील बुद्धिस्ट सेमिनरीत होईल. पाच दिवसीय शिबिरादरम्यान भदन्त धम्मसारथी बुद्ध, धम्म आणि संघ याविषयी मार्गदर्शन करतील, असेही ससाई म्हणाले.

भदन्त ससाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (5 मे) सायंकाळी 6 वाजता भदन्त नागवंश, भदन्त धम्मप्रकाश, भिक्खूनी संघप्रिया, नागकन्या, शीलानंदा आदींसह भिक्खू संघ करूणा, शांती, मैत्री आणि बुध्दाचा कल्याणाचा मार्ग यावर प्रवचन करतील. शनिवारी (6 मे) प्रबुद्ध साठे, डॉ. यशवंत मनोहर, आचार्य वानखेडे आणि स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले मार्गदर्शन करतील. रविवारी (7 मे) सायंकाळी 6 वाजता सूरमनी प्रभाकर धाकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बुद्घ-भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रा. अनिल खोब्रागडे, छाया वानखेडे यांच्यासह इतर गायक-कलावंत गीत सादर करतील. या कार्यक्रमाला दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी, भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक, उपासिका, भदन्त थेरो धम्मसारथी, भदन्त थेरो नागवंश, भदन्त थेरो नागाप्रकाश, भिक्खूनी संघप्रिया आदी उपस्थित राहतील.

बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, शाखा उंटखाना येथील बुद्धिस्ट सेमिनरीच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवार 10 मे रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. सुधीर फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भदन्त धम्मसारथी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राहुल सहारे आदी उपस्थित राहतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारताच्या समृद्ध कला, संस्कृती आणि वारशाने जगभरातील जी 20 प्रतिनिधींवर चिरस्वरूपी ठसा उमटवला आहे - केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर

Sat Apr 29 , 2023
लेहमध्ये पूर्व परिषद आयोजित करू नये, अशी विधाने करून अनेकांनी त्याबाबत संभ्रम निर्माण करूनही वाय 20 पूर्व परिषद यशस्वीरित्या पार पडली : अनुराग सिंह ठाकूर नवी दिल्‍ली :- लेहमध्ये आयोजित वाय 20 पूर्व परिषदेचा आज यशस्वीपणे समारोप झाला. ही पूर्व परिषद 26 ते 28 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती. भारताच्या अध्यक्षतेखालील जी 20 ने नवे टप्पे प्रस्थापित केले आहेत, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com