संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथे क्षुल्लक वादातून आरोपीने माजी नगरसेविका पुत्राला डोक्यावर खुर्ची मारून जख्मि केल्याची घटना नुकतेच दुपारी 3 दरम्यान घडली जख्मि माजी नगरसेविका पुत्राचे नाव विनय दिगाम्बर मेश्राम वय 39 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे यासंदर्भात जख्मि फिर्यादी विनय मेश्राम वय 39 वर्षे रा रमानगर कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सदानंद दहाट वय 56 वर्षे व ऋषी दहाट वय 30 वर्षे दोन्ही राहणार रमानगर कामठी विरुद्ध भादवी कलम 324,504 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.