संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात मागील काही दिवसापासुन चोरीचे प्रमाण वाढले असून शेतातून शेतकऱ्यांचे मोटरपंप, विजेचे तार व ट्रान्सफार्मर मधील ऑईल यांच्या वाढत्या चोरीच्या घटना ह्या दैनंदिन झाल्या असून या घटनेने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे तेव्हा या चोरीच्या घटनेवर आळा घालण्यासाठी पोलीस विशेष पोलीस पथक नियुक्त करून चोरीच्या घटनेपासून शेतकऱ्यांना मुक्तता द्यावी यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार तसेच नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक यांना सामूहिक निवेदन देण्यात आले. दरम्यान चोरिच्या घटनेला आळा घालण्यासंदर्भात विशेष चर्चा करण्यात आली.याप्रसंगी पोलीस अधिक्षक व पोलीस आयुक्त यांनी तात्काळ उपाय योजना करू असे आश्वासन दिले.
सामूहिक निवेदन देताना प्रामुख्याने महालगाव ग्रा प सरपंच प्रकाश गजभिये , सामाजीक कार्यकर्ता अनंता वाघ, रुपेश शेंदरे, विनोद शहाणे, गणपत वानखेडे, कोमल तट्टे, ज्ञानेश्वर इंगोले,बाबाराव चौधरी, गणेश गावंडे, गौरव इंगोले, सचिन ठाकरे, डाफ़, लंकेश शेंडे, हिरामण वासनिक,व इतर प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.