संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- कांद्री टोल नाक्या जवळील सर्व्हीस रोड वर नादुरूस्त उभ्या १२ चाकी ट्रक च्या सामोरिल ट्रक चालकाने ट्रक मागे घेऊन उभ्या ट्रक ला धडक मारून ट्रक केबिन चे नुकसान करून भरपाई मांगितल्यास ट्रक चालक तोफीक खान व कंडेक्टर आसिफला मार पिट केल्याने अशोक लेलॅंड ट्रक चालक व शिफ्ट कार चे तीन लोकाविरूध्द दखलगुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
बुधवार (दि.३०) ला रात्री ला १०.३० वाजता राष्ट्रीय महामार्गावरील बोरडा-कांद्री टोल नाक्यावर तोफीक खान मुकीद खान वय २७ वर्ष रा. नांदी तह. बरघाट जिल्हा सिवनी (म.प्र) चा १२ चाकी ट्रक क्र एमएच ४० वाय १९२५ ची वायरिंग खराब झाल्याने टोल नाका सर्विस रोडवर उभा असताना सामोरिल अशोक लेलँन्ड ट्रक क्र. सीजी ०८ ए एस ७९२२ च्या ट्रक चालकाने ट्रक मागे रिर्वस घेऊव उभ्या ट्रक ला धडक मारल्याने केबिनचे नुकसान झाल्याने अशोक लेलँन्ड ट्रक चालकास म्हटले कि, केबिन चे नुकसान केल्याने नुकसान भरपाई दे तेव्हा तो नुकसान भरपाई देण्यास नकार देऊन आपला ट्रक घेऊन नागपुर कडे पळत सुटल्याने त्याच्या ट्रक नंबर ची फोटो काढली असता त्याने ट्रक थांबवुन तोफीक खान ला शिविगा़ळ करू लागला आणि ट्रक मालकास फोन केल्याने अवघ्या ३० मिनीटा नंतर मारुती स्वीप्ट कार क्र. एम एच ४० आरआर ३१३१ ने तीन लोक आले आणि मला व माझ्या कंडेक्टर आसिफ वकील खान ला काठी ने मारपीट करित माझ्या मोबाईल फोडुन मोबाईल चे नुकसान करून मला जिवे मारण्याची धमकी देऊन पळुन गेले. या मारपीट ने आसिक खान ला डोक्याला मुका मार लागला असुन माझे पर्स मधिल एटीएम कार्ड, आधार कार्ड, लायसन्स पर्स सहित गायब झाली. अशी फिर्यादी १२ चाकी ट्रक क्र एमएच ४० वाय १९२५ चा चालक तोफीक खान मुकीद खान याने कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी आरोपी अशोक लेलँन्ड ट्रक क्र. सीजी ०८ ए एस ७९२२ चा चालक व शिफ्ट कारचे तीन व्यकती विरूध्द अप. क्र.५५३ /२०२४ कलम ३२४, ४२७, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.