– राज्य पदाधिकारी निवडीसाठी आज निवडणूक : १३ पदांसाठी होणार मतदान
मुंबई :- देशात क्रमांक एकची व जगातील ४३ देशांत कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे आज रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी लोकशाहीचा उत्सव रंगणार आहे. संघटनेची नूतन महाराष्ट्र राज्य कार्यकारणी निवडण्यासाठी मतदान होत असून १३ पदांसाठी राज्यातील तब्बल ३०० मतदार पत्रकार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, महानगर अध्यक्ष तसेच सर्व तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. मतमोजणी सोमवार दि. २४ रोजी होणार आहे.
राज्य पदाधिकारी निवडणूक २०२४-२५ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मागदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया होत असून ॲड. संजीवकुमार कलकोरी व सी.ए. सुरेश शेळके हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. प्रदेशाध्यक्ष, तीन कार्याध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष, सहा विभागीय अध्यक्ष अशा १३ पदांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. १३ पदांसाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्य, राज्यातील सर्व महानगराचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष असे ३०० सभासद मतदार पत्रकार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पसंतीक्रमानुसार १३ उमेदवारांना मतदान करायचे असून अनुक्रमे एक नंबरचे मतदान ज्या उमेदवाराला होईल त्याप्रमाणे पदाधिकारी निवड केली जाणार आहे. मतमोजणी सोमवार दि. २३ रोजी होणार असून सायंकाळ पर्यंत निकाल अपेक्षित आहे.
राज्यात सर्वाधिक सदस्य असलेली संघटना , संघटनेतील अंतर्गत पदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवून संघटनेची विश्वासर्हता अधिक द्ृढ व बळकट झाल्याने राज्यातील सभासद पत्रकारांतून याचे उत्र्स्फुत पणे स्वागत होत आहेत. तसेच निवडणूकीविषयी प्रचंड उत्सुकताही आहे.
अशी असेल मतदान प्रक्रिया..
* प्रदेशाध्यक्ष, तीन कार्याध्यक्ष, सहचिटणीस, उपाध्यक्ष, सहा विभागीय अध्यक्ष अशा १३ पदांसाठी मतदान
* राज्य कार्यकारणी, सर्व महानगर अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष,तालुकाअध्यक्ष असे राज्यात ३०० मतदार
* ऑनलाईन मतदान प्रक्रिया, प्रत्येक मतदारास पंसतीक्रमानुसार १३ मते देता येणार
* आज रविवार दि. २२ रोजी सकाळी ९ ते ७ या वेळेत मतदान, सोमवार दि. २३ रोजी मतमोजणी
* व्हॉईस ऑफ मीडियामधील पहिलीच निवडणूक, राज्यभरातील पत्रकारांत प्रचंड उत्सुकता
निवडणूकीत हे आहेत उमेदवार..
व्हॉईस ऑफ मीडियातील राज्य कार्याकारणीच्या १३ पदांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. यात अनिल मस्के, योगेंद्र दोरकर, अजित कुंकुलोळ, विजय चोरडिया, डिंगबर महाले, मंगेश खाटीक, संजय पडोळे, अरुण ठोंबरे, अमर चौंदे, किशोर कारंजेकर, सतीश रेंगे – पाटील, मिलींद टोके, सचिन मोहिते या उमेदवारांचा समावेश आहे.