अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद वाहनासह एकूण ५७३०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई

कन्हान :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान विभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरद्वारे खबर मिळाली की, पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीतून ट्रॅक्टरने अवैधरीत्या विनापरवाना रेती (गौणखनिज) चोरटी वाहतूक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिपळा इसापूर रेल्वे क्रॉसिंग जवळ नाकाबंदी केली असता ट्रॅक्टर येतांना दिसल्याने त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला. त्यावरून ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर रोडच्या बाजुला थांबविला तेव्हा सदर ट्रॅक्टरची पाहणी केली असता सदर ट्रॅक्टरचा क्र. MH-40 / CA-6845 असा दिसल्याने सदर ट्रॅक्टर चालकास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव मोहन लक्ष्मण तागडे, वय ३५ वर्ष, रा. पिपळा डाग बंगला वार्ड नं. ०१, ता. सावनेर असे सांगितले. त्यानंतर त्यास ट्रॅक्टरच्या मागील डाल्यात काय आहे? असे विचारले असता त्याने रेती (गौणखनिज) असल्याचे सांगितले, तेव्हा त्यास रेती वाहतुकीबाबत परवाना विचारले असता त्याने परवाना नाही असे सांगितल्याने सदर ट्रॅक्टर चालकाचे ताब्यातून ट्रॅक्टरचा क्र. MH-40/CA-6845 किमती ५,००,०००/-रु. ट्रॉली किंमती अंदाजे ७००००/-रू व ०१ ब्रास रेती किंमती ३०००/-रु. असा एकूण ५७३०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाणे खापरखेडा येथे आरोपीविरूद्ध अप क्र. ६३२ / २३ कलम ३७९ भादोवे, अन्वये गुन्हे नोंद करण्यात आलेला असुन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोदार (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे, सहायक फौजदार नाना राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, राजेंद्र रेवतकर, ईकवाल शेख, पोलीस नायक विरू नरड, संजय बरोदीया यांचे पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानाशी ठार करणाऱ्या आरोपीला अटक

Tue Oct 17 , 2023
भिवापूर :– अंतर्गत २२ किमी अंतरावर मौजा नांद ता. भिवापुर जि. नागपूर येथे दिनांक १४/१०/२०२३ मे २३.३० वा. ते २३.४५ वा. दरम्यान यातील मृतक दिनेश सुरेश चाचेरकर, वय ३५ वर्षे रा. नांद ता. भिवापूर जि. नागपूर हे आपल्या चुलत भावासह नांद येथील प्रयागयास बार येथे दारू पिण्यास गेले असता तिथे आरोपीचा मोठा भाऊ सुरज बुटे हा सुध्दा दारू पिण्यास आला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com