संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्रतिनिधी २ ऑगस्ट – शहरातील सार्वजनिक विहिरींचा गाळ उपसून त्यातील पाणी नागरिकांना वापरासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या अश्या मागणीचे निवेदन भाजप च्या शिष्टमंडळाने नगर परिषद चे उप मुख्याधिकारी नितीन चव्हाण यांना आज दुपारी सोपविले .
यादवनगर,रमानगर,कामगार नगर, छत्रपती नगर, कुंभारे कॉलनी,लुंबिनी नगर,गौतम नगर, आंनद नगर,सुदर्शन नगर या भागात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक विहिरी असून देखभाल दुरुस्ती अभावी बंद आहेत.याच भागात कित्येक महिन्यापासून दुषित पाणी पुरवठा होत असून नगर परिषद शुद्ध पाणी पुरवठा करण्यास अपयशी ठरली आहे त्यामुळे विहिरींचा उपसा करून विहिरी सार्वजनिक वापरा साठी सुरू करण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संजय कनोजिया,राजेश खंडेलवाल, लालसिंग यादव,प्रतिक पडोळे,राजु पोलकमवार यांचा समावेश होता