माजी नगरसेवक पुत्रावर हल्ला चढविलेल्या आरोपी विरुद्ध एट्रोसिटीचा गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी बस स्टँड जवळ झालेला शाब्दिक वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने माजी नगरसेवक रघुवीर मेश्रामच्या मुलावर सामूहिक हल्ला चढविलेल्या मुख्य आरोपी आदिल कुरेशी व ईतर आठ ते दहा आरोपी विरुद्ध भादवी कलम 324,323,143,147,149,506,504 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(1)(आर) व 3(1)(एस) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भांडणातील जख्मि फिर्यादी सुरज मेश्राम वय 40 वर्षे रा जुनी खलाशी लाईन कामठी हा 2 ऑगस्ट ला रात्री साडे नऊ दरम्यान कामठी बस स्टँड जवळ मित्र सोमय्याशी फोनवर बोलत असता 23 ते 24 वर्षाचा अनोळखी तरुणाने फोन वर इतक्या जोराने का बोलतोस यावरून दोघात शाब्दिक वाद घडून आला.मात्र हा वाद विकोपाला जाऊन वादाची ठिणगी ही आरोपीच्या घरापर्यंत पोहोचल्याने या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने आरोपी आदिल कुरेशी व त्याचे आठ ते दहा साथीदारांनी भुयार पुलिया जवळील रुबाब मेन्स वेअर दुकानजवळ उभा असलेल्या सुरज मेश्रामला अश्लील जातीवाचक शिवीगाळ देत मारझोड केली व कुणीतरी हवेत फायर केला .फायर चा आवाज ऐकताच सर्वांनी पळापळ केली दरम्यान जख्मि सुरज मेश्रामला डाव्या डोळ्याच्या वर तसेच डाव्या हाताच्या खांद्यावर जबर मारहाण करून घटनास्थळाहुन पळ काढला.जख्मि सुरज मेश्राम ला उपचारार्थ कामठी च्या रॉय हॉस्पिटल मध्ये दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वनविभागाच्या परीक्षेत गैरप्रकार नाही, वनविभागाचा खुलासा

Fri Aug 4 , 2023
मुंबई :- वनविभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गाची भरती प्रक्रिया टी.सी.एस.- आय.ओ. एन. यांच्यामार्फत 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षेद्वारे (ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न) घेण्यात येत आहे. प्रश्न पत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिका शिफ्टनिहाय वितरण करणे, परीक्षा घेणे, निकाल प्रकाशित करणे याबाबतची टीसीएस आयओएन या कंपनीची यंत्रणा ही अत्यंत गोपनीय मजबूत व अत्यंत सुरक्षित आहे. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com