नागपूर :- शासकीय मालमत्तेची अवैद्यारीत्या विक्री करीत इतरांची फसवणूक करणाऱ्यांवर १० जणांवर नागपूर महानगरपालिकेच्या स्थावर विभागाकडून वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाठोडा पोलिस ठाणे हद्दीतील मौजा- तरोडी (खुर्द) येथे खसरा क्र. ५५ (जुना क्र. 2/1, 5/1, 6/4 व 4) आराजी – 11.07 ही आर जमीन ज्याची किंमत रु. १४० कोटी इतकी आहे. ही जमीन नागपूर महानगरपालिकेच्या ताब्यात व वहिवाटीत आहे. असे असताना देखील नत्थू जागो गिरीपुंजे, (रा. तरोडी खुर्द, ता. कामठी जि. नागपूर) धनराज जागो गिरीपुंजे, सजाबाई जागो गिरीपुंजे, मनोहर जागो गिरीपुंजे, लक्ष्मी फत्तु गिरीपुंजे, प्रभाकर फत्तु गिरीपुंजे, अनिता अशोक कापसे, वनिता फत्तु गिरीपुंजे, सविता फत्तु गिरीपुंजे आणि स्नेहल डेव्हलपर्स & बिलडर्स प्रो. प्रा. विलास तुकारामजी सातपुते, (रा. गोपाल नगर) यांनी सदर जमीनीचे प्लॉट पडून अवैद्य रित्या विक्री केल्याची तक्रार मनपा स्थावर विभागाद्वारे फिर्यादी कार्यकारी अभियंता पंकज पराशर यांनी केली. त्यानुसार वाठोडा पोलिसांनी या दहाही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सदर जमिनीचा ही मुळ मालक जागो केशव तेली यांनी ३१ मार्च १९६२ ला नागपूर सुधार प्रन्यासला ताबा दिला. या संबंधाने मा. भुसंपादन अधिकारी, नागपूर यांनी भु-संपादन अवार्ड पारीत केला होता. असे असतांना जमिनीचा ताबा मुळ मालक जागो केषव तेली व त्यांचे व त्यांचे वारसदार यांनी संपूर्ण जमीनीचा भु-संपादन मोबदला प्राप्त केलेला होता व ती जमीन ताबा पावती नुसार नागपूर सुधार प्रन्यासला हस्तांतरित ही केले होती. वर्ष १९६९ ला नागपूर महानगरपालिका जागा हस्तांतरीत झाल्यानंतर ७/१२ वर मनपाचे नावाची नोंद करण्यात आली नाही. सदर जमीनीच्या ७/१२ वर मनपाच्या नावाची नोंद घेण्याची प्रक्रीया सुरू होती त्या कालावधीत वर्षे २०१६ मध्ये राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था (Sports Authority of india) यांना प्रकल्पाकरिता जागा देतांना ७/१२ वर गैरअर्जदारद्वारे गैर व्यवहार करून ७/१२ वर त्यांचे नाव नोंदविन्याचे दिसुन आले. त्यानंतर मनपातर्फे गैरअर्जदार विरुद्ध नंदनवन पोलिस ठाणे येथे याबाबतची तक्रार देण्यात आली. तसेच मनपाद्वारे दुरूस्ती करून ७/१२ वर फेरफार क्र. 631 दि. 14/09/2017 अन्वये मनपाचे नाव नोंदविण्यात आले.
सदर जमीन महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांच्या शासन निर्णयान्वये सार्वजनिक उपयोगीता करीता भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था (Regional centre of Sports Authority of india and national sports coaching Institute (SAI) ) यांना प्रकल्पासाठी 87.25 एकर जागा आवंटित केलेली आहे. व या जागेमध्ये खसरा क्र. 55 च्या समावेश आहे. व या खसरा क्र. 55 वर गैरअर्जदाराद्वारे अनाधिकृत अभिन्यास टाकुन खरेदी-विक्री करून गैर आर्थिक व्यवहार करण्यात आले आहे. अशी तक्रार करण्यात आली आहे.