तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

उमरेड :- दिनांक १७/०३/२०२४ रोजी गोपनीय माहीती मिळाली की, राहील मोहनिकर नावाच्या युवकाने त्याचा वाढदिवसाचा केक तलवारीने कापुन साजरा केला आहे. अश्या विश्वसनीय माहीती वरून आरोपी नामे राहील गजानन मोहनिकर वय १९ वर्ष, रा. कावरापेठ उमरेड याच्या राहत्या घरी जाउन त्याच्या घराची घरझडती घेतली असता त्याचे घरातुन एक प्राणघातक शस्त्र तलवार जप्त करण्यात आली. जप्त तलवारीसह व नमुद आरोपीला ताब्यात घेवून पोलीस नाईक पंकज बड्डे यांचे लेखी रीपोर्ट वरून आरोपी विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पो. हवा. राधेश्याम कांबळे हे करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार उमरेड विभाग उमरेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोलीस हवालदार प्रदिप चवरे, राधेश्याम कांबळे, पोलीस नाईक पंकज बड्डे, पोलीस अमंलदार गोवर्धन शहारे, उमेश बान्ते, म.पो.शि. सुषमा भोयर पोस्टे उमरेड (ना.ग्रा.) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामठी पंचायत समितीच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची मतदान जनजागृती रॅली

Wed Mar 20 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठी पंचायत समिति कामठी अधिकारी/कर्मचारी यांचे मतदान वाढीसाठी रॅलि व पथनाट्य कामठी :- कामठी विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज 20 मार्च ला कामठी पंचायत समितीच्या समस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीप कार्यक्रमा अंतर्गत कामठी पंचायत समिती कार्यालय ते तहसिल कार्यालय पर्यंत मतदान जनजागृती विषयी घोषणा देत मतदान जनजागृती रॅलि काढण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com