चोरी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद

खापरखेडा :- अंतर्गत ०५ कि.मी. अंतरावरील वारेगाव शिवार येथील फिर्यादी नामे- आशिष कैलास सिंगल, वय ३२ वर्ष, महालक्ष्मी सिटी चोकास कोराडी याच्या वारेगाव शिवार येथील स्टोन इन्फ्रा कंपनीमधील खुल्या जागेवरून १) ७० नग अॅल्युमिनियम पाईप प्रत्येकी १२ फिट लांब किंमती अंदाजे २,५०,०००/- रुपये २) ४० नग लोखंडी सेटिंग प्लेट किमती अंदाजे ७५,०००/- रुपये ३) १५ नग मॅटर स्ट्रीप किंमत अंदाजे २५,०००/- रुपये असा एकूण ३,५०,००० /- रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञान चोराने चोरून नेला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे अज्ञात आरोपीविरुद्ध कलम कलम ३७९ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार पवार व नं. ११९ पोस्टे खापरखेडा हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महानिर्मिती च्या प्रथम महिला मुख्य अभियंता म्हणून विजया रवींद्र बोरकर

Sun Jul 16 , 2023
नागपूर :- विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या रहिवाशी असलेल्या विजया रवींद्र बोरकर यांची महानिर्मितीच्या मुख्य अभियंता पदी निवड झाली असून महानिर्मितीमध्ये मुख्य अभियंता पदी महिला विराजमान होण्याची ही प्रथमच वेळ आहे. यापूर्वी उप मुख्य अभियंता या पदापर्यंत महिला अधिकाऱ्यानी काम केले आहे मात्र आता हा बहुमान प्रथमच विजया रवींद्र बोरकर यांनी पटकावला आहे. मुख्यालय मुंबई येथे मुख्य अभियंता(प्रकल्प व्यवस्थापन गट) येथे त्यांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com