अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार नराधम विरुद्ध गुन्हा दाखल..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 27:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौक रहीवासी नराधम आरोपी आकाश रमेश गेडाम वय 26 वर्षे ला एका 13 वर्षोय अल्पवयीन मुलावर तसेच फिर्यादीच्या घराजवळ राहणाऱ्या 15 वर्षोय अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी भादवी कलम 377, 506 भादवी सहकलम 4,6,8,10,12 पोस्को कायद्या अनव्ये नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 मार्च ला सायंकाळी साडे चार वाजता एका लहानशा गोडाऊन मध्ये सदर नाराधमाने एका 13 वर्षीय अल्पवयीन बालकासह अनैसर्गिक जबरी संभोग केला व त्याचे व्हिडीओ काढून ते सार्वजनिक करण्याची धमकी दिली तसेच सदर पीडित 24 मार्च ला सकाळी साडे नऊ दरम्यान पीडित बालकाच्या घराशेजारील 16 वर्षोय मुलांसोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला.यासंदर्भात पीडित 13 वर्षीय मुलाच्या आईने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

निवडणूक प्रक्रियेसाठी शासकीय वाहने जमा करा; अन्यथा कारवाई - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर

Thu Mar 28 , 2024
नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकरी यांच्या कार्यालयास वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कार्यरत शासकीय वाहने अधिग्रहीत करण्याचे काम सुरू आहे. वाहने अधिग्रहीत करण्यासाठी निवडणूक विभागाकडून संबंधित कार्यालय प्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत. ज्या कार्यालयांनी वाहने जमा केली नाहीत त्यांनी 28 मार्चपर्यंत वाहने जमा करावीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com