निवडणूक प्रक्रियेसाठी शासकीय वाहने जमा करा; अन्यथा कारवाई – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकरी यांच्या कार्यालयास वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कार्यरत शासकीय वाहने अधिग्रहीत करण्याचे काम सुरू आहे. वाहने अधिग्रहीत करण्यासाठी निवडणूक विभागाकडून संबंधित कार्यालय प्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत. ज्या कार्यालयांनी वाहने जमा केली नाहीत त्यांनी 28 मार्चपर्यंत वाहने जमा करावीत अन्यथा कार्यालय प्रमुखांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ही अत्यंत संवेदनशील व कालमर्यादेतील प्रक्रिया असल्यामुळे निवडणूकीच्या कामाकरीता ज्या कार्यालय प्रमुखांनी वाहने जमा करण्याबाबत प्राधान्याने कारवाई करणे आवश्यक आहे. कर्तव्यात कसूर झाल्यास लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १६० अंतर्गत कार्यालय प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिलेले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय संविधान देशाचा परिवर्तनकारी दस्तावेज - न्या.बी.आर. गवई

Thu Mar 28 , 2024
– कोलंबिया लॉ स्कूलमध्ये ‘परिवर्तनात्मक संविधानवादाची ७५ वर्षे’ विषयावर व्याख्यान नागपूर :- भारतीय संविधान हा देशातील सर्व नागरिकांसाठी न्याय, समानता आणि सन्मान राखणारा परिवर्तनकारी दस्तावेज आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी कोलंबिया लॉ स्कूलमधील व्याख्यानात केले. संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या भेटीमध्ये मंगळवारी २६ मार्च रोजी न्यूयॉर्क येथील कोलंबिया लॉ स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात मा. न्यायमूर्ती बी.आर.गवई यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com