संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौक रहीवासी नराधम आरोपी आकाश रमेश गेडाम वय 26 वर्षे ला एका 13 वर्षोय अल्पवयीन मुलावर तसेच फिर्यादीच्या घराजवळ राहणाऱ्या 15 वर्षोय अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी भादवी कलम 377, 506 भादवी सहकलम 4,6,8,10,12 पोस्को कायद्या अनव्ये नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 मार्च ला सायंकाळी साडे चार वाजता एका लहानशा गोडाऊन मध्ये सदर नाराधमाने एका 13 वर्षीय अल्पवयीन बालकासह अनैसर्गिक जबरी संभोग केला व त्याचे व्हिडीओ काढून ते सार्वजनिक करण्याची धमकी दिली तसेच सदर पीडित 24 मार्च ला सकाळी साडे नऊ दरम्यान पीडित बालकाच्या घराशेजारील 16 वर्षोय मुलांसोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला.यासंदर्भात पीडित 13 वर्षीय मुलाच्या आईने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.