काटोल :- दिनांक ०६/०७/२०२३ मे १८.३० वा. ते १९.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी वय १५ वर्ष ही आपल्या तिघी मैत्रिणीबरोबर ट्युशनला गेल्या होत्या. टयुशन संपल्यावर तिघीही घरी जाण्याकरीता निघाले तेव्हा आरोपी नामे १) – तुषार तुळशिराम नासरे, वय २१ वर्षे २) रोशन शेषराव वरोकर, वय २४ वर्षे दोन्ही रा. खैरगाव ता. नरखेड जि. नागपुर हे फिर्यादीचा पाठलाग करत त्यांच्या बद्दल बोलत होते. तेव्हा फिर्यादीने एका मैत्रिणीला तिचे घरी सोडले व नंतर दुसरी मैत्रिण व फिर्यादी ही घरी जात असता त्यांचे पाठी मागेमागे मैत्रिणीचे घरपर्यंत आले फिर्यादीने मैत्रिणीला घरी सोडुन आपली सायकल जोरात चालवुन घरी जाण्याकरीता निघाली तेव्हा दोघे आपले मोटर सायकलने फिर्यादीचे मागे आले व फिर्यादी सोबत बोलू लागले फिर्यादी त्यांचे सोबत बोलली नाही तेव्हा फिर्यादीची आते बहीण दिसली तिला फिर्यादीने सांगीतले कि हे दोघेही माझे मागे मागे आले. फिर्यादी सोबत बोलत आहे असे सांगीतले तेव्हा ते दोघे मोटरसायकल वरून मागे पाहत होते. हातवारे करीत होते त्यावरून फिर्यादीचे बहीण हिने जवळ असलेल्या पानठेल्यावाल्याला काही मुले आमचा पाठलाग करीत असल्याबाबत सांगितले असता पानठेलावाल्याने त्यांचे ओळखीचे दोन तिन माणसे घेवुन त्या दोघांना पकडुन ठेवले. फिर्यादीचे बहिणीने पोलिसांना फोन केला व पोलिस तेथे येवुन त्या दोघाना पोलिस स्टेशन काटोल येथे आणले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. काटोल येथे आरोपीताविरुध्द कलम ३५४ ३५४(अ) ३५४(ड) भादवि सहकलम १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शितल खोब्रागडे पोलीस स्टेशन काटोल या करीत आहे.