नागपूर :- पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत प्लॉट नं. ४०, गोधनी रोड, हिंगाबाई राकळी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे विलास प्रभाकर येमदे तय ४२ वर्षे, हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह आपले मुळगावी बानाबाकोडा, छिंदवाडा येथे गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कडी-कोंडा, कुलूप तोडुन, आत प्रवेश करून, बेडरूम मधील लाकडी आलमारीतुन रोखा ६००/- रू व सोन्या चांदीचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे १,४८,६००/- रू. चा मुद्देमाल बोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे मानकापूर येथे पोउपनि कांबळे यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.