नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत प्लॉट नं. ३६, श्रीनगर, बहादुरा ग्रामपंचायत जवळ, सक्करदरा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे जयदेव भगवान साळवे वय ३१ वर्षे, हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह आपले मुळ गावी पोळा या सणाकरीता येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे दाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून रोख ६,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण किंमती अंदाजे २,०९,५००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सक्करदरा येथे पोउपनि, संजय सिंग यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.