नागपूर :- दिनांक १०.१२.२०१८ चे ११.०० वा. ते दि. ०३.०४.२०२३ मे १६.०० वा चे दरम्यान फिर्यादी गजाननः आनंदराव देवकर वय ७० वर्ष, रा. स्नेहनगर, महिला आश्रम समोर, सेवाग्राम रोड, वर्धा यांना आरोपी क. १) अनिल अजाबराव ठाकरे वय ५५ वर्ष रा. प्लॉट न. ११४, जुना सुभेदार ले आउट, हुडकेश्वर नागपूर २) मुखत्यार आलम मोहम्मद अली रा. ओम साईनाथ नगर, २७ नागपूर ३) नाझीम अली सैय्यद अली रा. ४३१ आशीर्वाद नगर, नागपूर यांनी संगणमत करून, आरोपी क १ याने फिर्यादीस से एन. आय. टी नागपूर येथे नोकरीत असल्याचे सांगुन फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपी क्र. २ व ३ यांचेसह मिळुन फिर्यादीस उमरेड रोड येथील जाफरी हॉस्पीटलचे बाजुला असलेले एन. आय. टी. नागपूरचे भुखंड विक्रीस आहे असे खोटे सांगुन त्या भुखंडाचे बनावट कागदपत्रे तयार करून ते कागदपत्रे खरे असल्याचे फिर्यादीस भासवुन फिर्यादी कडुन १,५२,००,०००/- रु घेवुन फिर्यादी ची आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सक्करदरा येथे पोउपनि संजय सिंग-८९८३५०१३८३ यांनी आरोपीविरूध्द कलम ४२०, ४०६, ४६५ ४६७, ४६८, ४७९, ३४ भा.दं.बी अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी क्र. १ यास अटक केला आहे. पुढील तपास सुरू आहे.