भिवापुर :-दिनांक २९/१२/२०२३ रोजी पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ शासकीय वाहनाने पोलिस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना मौजा महसुल चेक पोस्ट नाका भिवापुर गावाजवळ भिवापुर ते उमरेड जाणारे हायवे रोडवर अंदाजे २३/१५ वाजता दरम्यान भिवापुर कडून नागपुरकडे अवैद्यरित्या विनापरवाना रेती (वाळु) टिप्पर मध्ये लोड करुन येतांना एक टिप्पर दिसुन आल्याने शासकीय वाहन नेवून टिप्पर चालकास थांबण्याचा इशारा केला असता टिपर चालकाने टिप्पर क्र. MH-49/AT-9790 रोडचे कडेला थांबविल्याने टिप्परची पाहणी केली असता टिप्पर मध्ये रेती (वाळु) अंदाजे ०६ ब्रास आढळून आल्याने टिप्पर चालकास रेतीबाबत परवाना (रॉयल्टी) बाबत विचारपुस केली असता परवाना नसल्याचे सांगितल्याने तसेच १० चक्का टिप्पर क्रमांक MH-49 /AT-9790 च्या चालकास नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव विनोद तामसिंग मडावी, वय ३२ वर्ष, रा., ग्राम गोवारी ता. धनोरा जि. शिवनी (एम.पी.) ह. मु. दिघोरी चौक नागपुर असे सांगितले, दोन्ही टिप्पर चेक केले असता टिप्पर मध्ये रेती (वाळु) भरून असल्याचे दिसून आल्याने, रेती वाहतुकीवावत टिप्पर MH-49/AT-9790 च्या चालकास रॉयल्टी विचारली असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने रेतीबाचत विचारपुस केली असता परवाना नसल्याचे सांगितले तसेच सदरची रेती (वाळु) ही टिप्पर मालक नामे सागर साखरे, वय ३५ वर्ष, रा. उमरेड यांचे सांगणेवरुन मौजा नांद ता. पवनी जि. भंडारा या गावातून भरून आणल्याचे सांगितले. आरोपींच्या ताब्यातून १) १० चक्का टिप्पर क्र. MH-49 AT-9790 किंमती २०,०००००/- रुपये व टिप्पर मध्ये ६ ब्रास रेती प्रत्येकी ५०००/- रूपये ब्रास प्रमाणे एकुण ३००००/- रुपयाचा मुद्देमाल व असा एकुण २०,३००००/- रुपयाचा माल टिप्पर मध्ये अवैधरित्या विनापरवाना शासनाचा महसुल बुडवुन रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने सदर टिप्पर चालक व मालक यांचेविरुध्द कलम ३७९, १०९ भा.द.वि. सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक संदीप पखाले यांचे मार्गदशनात पोलीस स्टेशन भिवापूर येथील ठाणेदार प्रमोद चौधरी, सहायक फौजदार अशोकसिंग ठाकूर, पोलीस अंमलदार मनोज चाचरे, चालक अतुल बांते यांनी पार पाडली.