अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीताविरुद्ध गुन्हा नोंद

पोलीस स्टेशन देवलापारची कार्यवाही

देवलापार :- पोलीस स्टेशन देवलापार येथील स्टाफ रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे देवलापार हद्दीतील ०८ किमी अंतरावर मौजा बेलदा शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची ट्रॅक्टर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन देवलापार यांनी बेलदा शिवार येथे नाकाबंदी करून १) ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ४० वी. जे. ८९२३ च्या चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात टॅक्टर चालक आरोपी नामे— संदिप मायाराम कुंभरे वय ३२ वर्षे रा. वार्ड क्रमांक ३ बेलदा ता. रामटेक हा टॅक्टरमध्ये विना रॉयल्टी अवैधरीत्या रेतीची चोरी करतांना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातून टॅक्टर क्रमांक एम. एवं ४० बी. जे. ८९२३ अंदाजे किंमती ४,००,०००/- रू. ज्यामध्ये १ ब्रास रेती किमती ३,०००/- रू. असा एकुण किमती अंदाजे ४,०३,०००/- रूपयाचा मुद्देमाल

२) ट्रॅक्टर क्र. एम. एच. ४० / सौ.क्यु.- २३८२ अंदाजे किमती ६,००,०००/- रु. चा चालक आरोपी नामे- नितेश नारायण मोरगडे, वय ३२ वर्ष, रा. वार्ड क्र. ०१, बेलदा ता. रामटेक याने आपल्या वाहनात १ ब्रास रेती किंमती ३,०००/- रू. एकुण किमती ६,०३,००० रूपयाचा मुद्देमाल असा एकुण दोन्ही कहनातील ०२ ग्रास रेती एकुण किंमती अंदाजे ६,०००/-रु. दोन्ही वाहनासह एकूण १००६००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोलीस नायक विजय किसनराव परमेश्वर व नं. २०० पोस्टे देवलापार यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. देवलापार येथे आरोपीताविरुद्ध कलम ३७९ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड पोस्टे देवलापार  हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल 

Thu Jun 29 , 2023
पो.स्टे. सावनेर :- अंतर्गत ०२ कि.मी. अंतरावर बोरूजवाडा झोपडपट्टी येथे जखमी नामे रूपेश मानिक रोकडे, वय २४ वर्ष, रा. सरासावरी ता. सौसर मध्यप्रदेश – हा त्याची पत्नी राणी हिला घेण्यासाठी फिर्यादी नामे- गणेश संपत परतेती, वय ३८ वर्ष, रा. सरासावरी ता. सौसर म. प्र. याचेसह सासुरवाडी बोरूजवाडा येथे दुपारी ०३.०० वा. आला असता आरोपी नामे- बाबुराव विठोबा भोजन, रा. बोरूजवाडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!