पो.स्टे. सावनेर :- अंतर्गत ०२ कि.मी. अंतरावर बोरूजवाडा झोपडपट्टी येथे जखमी नामे रूपेश मानिक रोकडे, वय २४ वर्ष, रा. सरासावरी ता. सौसर मध्यप्रदेश – हा त्याची पत्नी राणी हिला घेण्यासाठी फिर्यादी नामे- गणेश संपत परतेती, वय ३८ वर्ष, रा. सरासावरी ता. सौसर म. प्र. याचेसह सासुरवाडी बोरूजवाडा येथे दुपारी ०३.०० वा. आला असता आरोपी नामे- बाबुराव विठोबा भोजन, रा. बोरूजवाडा हा आजेसासरा असून यास राणी घरी आली आहे का असे विचारले असता आरोपीने त्यास अश्लील शिवीगाळ करून तुम्ही नेहमीच झगड़े भांडण करता असे म्हणुन शिवीगाळ करू लागला तेव्हा जखमीने आरोपीस आमचे नवरा बायकोचे मॅटर आहे आम्ही पाहून घेऊ तुम्ही शिव्या देवु नका असे म्हणून घरामध्ये असलेल्या पत्नी सोबत बोलायला गेला व तिला “गावाले चालते का “असे म्हणाला तेव्हा तिने आज येत नाही उदया येईल तेव्हा आरोपीने पुन्हा जखमीला शिवीगाळ करू लागला. जखमीने सुध्दा शिवीगाळ करण्यास सुरवात केली असता आरोपीने त्यास थांब तुझ्यात कोती रंगदारी आहे असे महणुन नेसलेल्या धोतरातून चाकु काढुन जखमीच्या पोटात खुपसुन गंभीर जखमी केले. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम ३०७ २९४ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नागवे पोस्टे सावनेर हे करीत आहे.
जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com