– नागपूर ग्रामीण विशेष पथकाची कारवाई
नागपूर :-दिनांक ०४/०४/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे कन्हान हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, १६ चक्का एल पी गाडी आमडी फाट्याकडून कन्हान मार्ग नागपूर कडे अवैधरीत्या विनापरवाना रेती वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून जबलपूर ते नागपूर मेन हायवेरोडवर टेकाडी शिवारात (साटक) जिवो पेट्रोलपंप जवळ नाकाबंदी केली असता १६ चक्का टाटा कंपनीची एलपी गाडी क्र. एम.एच-३२/ए.के-१७८६ चा चालक आरोपी नामे- १) गणेश जनार्धन नेहारे वय ४० वर्ष रा. वार्ड क्र. १ केळझर ता. सेलु जिल्हा वर्षा २) राजेंद्र बबनराव वांदिले, वय ४२ वर्ष रा. सेलु जिल्हा वर्षा ३) नागो मारोतराव सावरकर वय ३५ वर्ष रा. वार्ड क्र. ११ सेलु वर्धा यांना स्टाफने थांबवून पाहणी केली असता वाहनामध्ये अंदाजे १४ ब्रास रेती मिळून आल्याने सदर वाहन चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपींच्या ताब्यातून १६ चक्का टाटा कंपनीची एलपी गाडी क्र. एम.एच-३२/ए.के-१७८६ किंमती ३८,००,०००/- रू. मध्ये अंदाजे १४ ब्रास रेती किंमती प्रत्येकी ब्रास ५०००/-रू. प्रमाणे ७०,०००/-रू. वगेवगळया कंपनीचे मोबाईल किंमती १४,०००/-रू. असा एकुण ३८,८४,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे १) गणेश जनार्धन नेहारे वय ४० वर्ष रा. वार्ड क्र. १ केळझर ता. सेलु जिल्हा वर्षा २) राजेंद्र बबनराव वादिले, वय ४२ वर्ष रा. सेलु जिल्हा वर्षा ३) नागो मारोतराव सावरकर वय ३५ वर्ष रा. वार्ड क्र. ११ सेलु वर्षा ४) पाहीजे आरोपी इरशाद सिंकदराखॉ पठान, वय ३७ वर्ष रा. सेलु वर्षा असे एकुण ०४ आरोपी यांचेविरुद्ध पोस्टे कन्हान येथे अप क्र. २५९/२०२४ कलम ३७९, १०९, ३४ भा. द.वी. सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१, ०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. भिवापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सा. यांचे विशेष पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, पोलीस हवालदार ललीत उईके, पोलीस नायक प्रणय बनाफर, पोलीस अंमलदार कार्तिक पुरी, बालाजी बारगुले विशेष पथक नागपूर ग्रामीण यांनी केली.