– पोलीस स्टेशन रामटेक ची कारवाई
रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ यांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम आपले टिप्पर वाहन क्र. एम एच ४०/२११२ ने अवैधरीत्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ यांनी किमया हॉस्पिटल रामटेक येथे नाकाबंदी केली असता घटनास्थळावर टिप्पर वाहन क्र. एम एच ४०/२११२ येतांना दिसले. टिप्परच्या चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात चालक आरोपी नामे शेख नशिब शेख रफिर, वय ४२ वर्षे, रा. ०४ शकीला बेकरी जवळ ताजनगर नं. १ अमरावती हा रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने चालकास रेतीच्या रॉयल्टीवावत विचारपूस केली असता त्याने रेती परवाना नाही असे सांगिल्यावर आरोपीचे ताब्यातून टिप्पर वाहन क्र. एम एच ४०/२११२ किंमती २६,००,०००/- रू. मध्ये १७ ब्रास रेती ५१,०००/- रू. असा एकूण २६,५१,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी पोना मंगेश सोनटक्के पोस्टे रामटेक यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे आरोपीविरुध्द कलम ३७९ भांदवि, सहकलम ४८ (7) (8), महाराष्ट्र जमीन महसुल अधि. १९६६, सहकलम ४,२१ खान खनिजे अधिनियम १९५७, कलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रति. अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामटेक येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, पोहवा अमोल इंगोले, पोना मंगेश सोनटक्के, प्रफुल रंधई, पोशि धिरज खंते, शरद गिते यांनी पार पाडली.