अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

अरोली :- पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, मौजा चोखाळा येथे अवैधरित्या विनापरवाना रेती (वाळू) ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये लोड करून वाहतुक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून मौजा चोखाळा येथे नाकाबंदी करीत असताना सोनालीका कंपनीचा क्र. डी आय ४७ आर एक्स क. एम. एच-४०/सि.ए. २४९७ आढळुन आला. स्टाफने वाहनास थांबवून पाहणी केली असता वाहनामध्ये ०१ ब्रास रेती मिळून आल्याने सदर ट्रॅक्टर चालक आरोपी नामे शुभम गजानन कुंभरे, वय २४ वर्ष, रा. बाबदेव यास ट्रॅक्टर मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही बोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीच्या ताब्यातून सोनालीका कंपनीचा क्र. डी आय ४७ आर एक्स क्र. एम. एच. ४०/सि.ए. २४९७ किंमती अंदाजे ३,००,०००/- रू व लाल रंगाची विना नंबरची ट्राली कि. १,५०,०००/- रू व १ ब्राँस रेती कि. ३,०००/- रू. असा एकुण ४,५३,०००/- रू. चा मुददेमाल जप्त करून आरोपीविरूद्ध पोस्टे अरोली येथे कलम ३७९ भा.दं.वी. सहकलम ४८ (८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१, ०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. भिवापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे अरोली येथील ठाणेदार सपोनि फुलेकर यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार शाम पोकळे, विकी तोतरे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Sakhe Sobati’s blood donation camp on Apr 28 

Wed Apr 24 , 2024
Nagpur :- Sakhe Sobati Foundation, Nagpur, has organised a mega blood donation camp on April 28 at IMA Hall, North Ambazari Road. Indian Medical Association (IMA) Nagpur, the 1986 batch of GMC Nagpur and IGMC Nagpur along with GMC Nagpur Blood Bank have extended their valuable support to the camp, which has been organised in the fond memories of late […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com