नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत प्लॉट न. ११३९, अशोक नगर, गोड मोहल्ला, येथे राहनारा आरोपी सत्यजित उर्फ बबलु सतन रॉय, वय ३८ वर्षे हा त्याचे राहते घरी इतर आरोपी २) कुणाल प्रफुल्ल डोंगरे, वय २८ वर्षे लष्करीबाग, ३) सुरज बलदेव गेडाम, वय २० वर्षे, रा. शिकारपुर, बैलर, ४) गुलशन लक्ष्मीनारायण कैथवास, वय ३६ वर्षे, रा. अशोकनगर, ५) इस्राईल मुनिर अहमद, वय ६५ वर्षे, रा. आसिनगर, टेका, ६) उमेश डिगांबर डोंगरे, वय ४० वर्षे, रा. पंचशिल नगर, ७) हुमायु अख्तर सुभराती अन्सारी, वय २८ वर्षे, रा. आझाद बुनकर कॉलोनी, पाचपावली याने सोबत स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता राजधानी नाईट नावाचे जुगारावर सट्टापट्टीने आकड्यांची लागवाडी खायवाडी करतांना समक्ष मिळुन आले त्याचे ताब्यातून आकडे लिहीलेल्या विलया, पाना, एकुण ०५ मोबाईल, मोटारसायकल के. एम. एच. ४९ ए झेड. ३४८२, होन्डा डिलक्स मोटारसायकल क एम. एच. ३२ सि.डी. ३८६५ ख २३,०००/- रु. व इतर साहीत्य असा एकूण १,६५,३१०/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे पाचपावली येथे कलम ४, ५ महा जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वरील कामगिरी पोलीस ठाणे पाचपावली येथील वोनि जाधव, पोनि अंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. सोमवंशी, पोउपनि खाडे, पोहवा भोगे, नापोअ शेख, कार्य जावरकर, मैनेवार, यादव, पोज, शेंदे, चिकटे, लोखंडे, चौधरी, डोये, व मपोअ निशा राऊत यांनी केली.