नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत राहणाऱ्या ४९ वर्षीय फिर्यादी महिला यांची इंस्टाग्राम आयडीवरून आरोपी साहील मल्होत्रा, वय ३० वर्षे, रा. लुधीयाना याचेसोबत ओळख झाली व त्यांची मोबाईलवर बोलचाल होती. नोव्हेबर २०२२ मध्ये आरोपी हा नागपूरला फिर्यादीचे घरी येवुन, घरी कोणीही नसल्याचा फायदा घेवुन फिर्यादीस कोल्ड्रीक्समध्ये कोणतेतरी गुंगीकारक पदार्थ टाकुन फिर्यादीसोबत जबरीने शारिरीक संबंध केले व त्याचे फोटो काढले तसेच व्हिडीयो बनविला व लुधीयाना येथे परत गेला. आरोपीने नोव्हेबर २०२२ ते दिनांक ०५.०४.२०२४ चे दरम्यान, फिर्यादीस मॅसेज करून पैश्याची मागणी केली व पैसे न दिल्यास काढलेले फोटो व व्हिडीयो तिचे पतीला व मुलांना दाखविण्याची धमकी दिली. फिर्यादीने भितीपोटी वेळोवेळी ऑनलाईन व ईतर माध्यामातुन आरोपीला ६ ते ७ लाख रूपये पाठविले. आरोपीने फिर्यादी सोबत जबरी संभोग करून व्हिडीओ बनवुन फिर्यादीकडून खंडणी घेतली व पुन्हा खंडणीची मागणी करून, न दिल्यास फोटो व व्हिडीओ नातेवाईकांना पाठविण्याची व व्हायरल करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिनांक ०६.०४.२०२४ रोजी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे सपोनि भातकुले ८८८८८४१७१५ यांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (एन), ३२८, ३८४ भा.द.वि. कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे