फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत प्लॉट न. २४, तिवारी नगर, भिलगाव, येथे राहणारे फिर्यादी आशिष ज्ञानदेव दवंडे वय २७ वर्षे, हे घरी हजर असता, त्यांना अनोळखी आरोपीने व्हॉट्सअप वरून फिर्यादीस दोन आयडी पाठवुन पार्ट टाईम जॉब ऑफर केला व टास्क देवुन टास्क पूर्ण केल्यास आर्थिक आमीष दाखविले. फिर्यादी यांनी टास्क पूर्ण केले. आरोपीने फिर्यादीस फायदा देवून रक्कम परत दिली व फिर्यादीस फायदा होत असल्याचे दर्शविले. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीने फिर्यादीस गुंतवणुक केल्यास चांगले रिफंड देण्याचे आमीष दाखवून फिर्यादीचे बँकेचे वेगवेगळया खात्यातून वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यात एकुण १४,४९,११२/- रु. ची गुंतवणुक करण्यास भाग पाडले व कोणताही फायदा न देता, कोणतीही रक्कम परत दिली नाही. फिर्यादीस त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून रक्कम घेवुन फिर्यादीचा विश्वासघात करून ऑनलाइन आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारी वरून पोलीस ठाणे सायबर येथे सपोनि जगदाळे यांनी आरोपीविरूद्ध कलम ४२० भा.दं.वि. सहकलम ६६) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गावठी पिस्टलसह आरोपीस अटक

Mon Jul 10 , 2023
नागपूर :- गुन्हे शाखा युनिट क्र. ०३ चे अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत सापडा रचुन आरोपी क्र १) मोहम्मद इरफान मोहम्मद जाहीद वय २६ वर्ष, रा. आजरी माजरी, काच कंपनी जवळ, यशोधरानगर, नागपूर यांच्या घराची झडती घेतली असता त्याचे जवळ एक गावठी पिस्टल व एक राउंड किमती अंदाजे ५०,१००/- रू. चा मुद्देमाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com