नागपूर :- फिर्यादी अभिषेक रमेश खवासे वय २७ वर्ष रा. प्लॉट नं. २०६ बुध्द विहाराजवळ कुंभारपुरा नागपुर यांना त्यांची आडी कार क. यु.पी. १६ बी. जे ८६०० विकी करायची होती. आरोपी सुरज शर्मा रा. ऐ/७२/१५/५ प्रोसीआर रोड हेरीटेज बाजुला हैद्राबाद यांनी, दिनांक १२.०९.२०२१ चे १५.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत, सिव्हील लाईन, प्लॉट न. ३२१ प्रियदर्शनी आर.टी.ओ. ऑफीस जवळ नागपुर येथे भेटुन फिर्यादीची ऑडी कार २८,००,०००/- रू विक्री करून देतो असे म्हणुन फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादी जवळुन त्यांची नमुद ऑडी कार घेतली होती. आरोपीने फिर्यादीची गाडी विकी करून न देता तसेच गाडी परत न करता स्वतःचे आर्थीक फायदयाकरीता गाडीची परस्पर विक्री करून फिर्यादीस रक्कम न देता फिर्यादीचा अन्यायाने विश्वासघात करून फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्ज चौकशीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी येथे वपोनि चकाटे यांनी आरोपीविरूध्द कलम ४०६, ४२०, भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.