नागपूर :-फिर्यादी रिजवाना आसीफ शेख वय ३६ वर्ष रा. जाफर नगर, रोज कॉलोनी, गिट्टीखदान, नागपूर यांनी तसेच त्यांची आई नामे फरीदा आबू शेख यांनी दिनांक १०.०६.२०२० रोजी पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत गरीब नवाज चौक, खरबी येथील थ्री लॅण्ड डेव्हलपर्स चे ऑफीस मध्ये आरोपी अंसार रहीम बेग मिर्जा वय ४६ वर्ष रा. प्लॉट नं. १०७, रोशनवाग, खरबी, नागपूर याचे कडुन पहन ३३. खसरा नं. २३/१. मौजा पांडुर्णा, येधील प्लॉट नं. ९० व प्लॉट नं. ९४ दोन्ही ६०० स्कवेअर फुटचे प्रति प्लॉट ३ लाख रूपया प्रमाणे एकुण ६ लाख रूपये देवून विकत घेतले होते. आरोपीने नमुद प्लॉटचे कब्जापत्र तयार करून दिले होते. परंतु नमुद दोन्ही प्लॉट हे दुसऱ्या डेव्हलपर्सच्या मालकीचे असल्याचे फिर्यादीला समजले. आरोपीने फिर्यादीला दुसऱ्या डेव्हलपर्सच्या मालकीचे जागेवरील प्लॉट त्याचे आहे असे सांगुन फिर्यादी व फिर्यादीची आई यांची एकुण ६,००,०००/- रू ची फसवणुक केली. तसेच फिर्यादी ईरफान अहमद रहमतउल्ला यांना महेश लॅण्ड डेव्हलपर्स, वाठोडा येथील पार्टनर आरोपी किशोर चंपतराव भुवंर वय ५६ वर्ष रा. प्लॉट नं. ११२. पिपळा ग्राम पंचायत जवळ, हुडकेश्वर, नागपूर याने मौजा नरसाळा पहन ३७, खसरा नं. १२६, या ले-आउट मधील प्लॉट नं. २६, एकुण १६३९ चौरसफुट एकुण ३,८१,०००/- रूपयात विक्री केला होता. परंतु आरोपीने नमुद प्लॉटवर कोर्टात केस सुरू आहे असे सांगून फिर्यादीला दुसरा प्लॉट देण्याचे कबुल करून अदयाप पावेतो कोणतेही कागदपत्र तयार करून न देता फिर्यादीची अन्यायाने विश्वासघात करून आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्ज चौकशीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि. कारडवार यांनी दोन्ही आरोपींविरूध्द कलम ४२०, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे