आशाचा २७ फेब्रुवारी पासून होणाऱ्या पोलिओ लसिकरनावर बहिष्कार……

नागपूर – महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक फेडरेशन ( सीआयटीयू ) ने घेतलेल्या निर्णयानुसार वेळोवेळी आंदोलन व निवेदन देऊन सुद्धा राज्य शासनाने स्वतः मंजूर केलेला निधी देण्याकरता टाळाटाळ करण्यात येत आहे. कोरोणाच्या संकटात सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांचे प्राण वाचवणे व लागोपाठ विविध सर्वे करून माहिती उपलब्ध करून देण्याचे काम आशा वर्कर करत राहिल्या. केंद्राने तर कोणताही निधी मंजूर केला नसून राज्य शासनाने मंजूर केलेला निधी सुद्धा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. पोलिओ लसीकरण मोहीम राबवत असताना अल्प मोबदला देण्यात येतो.तो किमान ३०० रू. रोज देण्यात यावा.
२५ फेब्रुवारी पर्यंत थकित मानधन न दिल्यास खालील प्रमाणे विविध मागण्याला घेऊन पोलिओ लसिकरनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची नोटीस आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू ) नागपूर तर्फे मनपा आयुक्त, मनपा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सी ई ओ, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कॉ.राजेंद्र साठे, कॉ.प्रीती मेश्राम, कॉ. रंजना पौनिकर, कॉ. रुपलता बोंबले यांनी निवेदन दिले. मार्च २०२० पासून कोरोनाचा भारतात  प्रवेश झालेला आहे. त्या कालावधी पासून कोरोणाला हद्दपार करण्याकरता आशा वर्कर सतत झटत आहेत. केंद्र सरकार असो की राज्य सरकार कोणीही काम करून सुद्धा मोबदला दिलेला नाही परंतु दवाब बनवून आशा वर्कर कडून काम करून घेतले जाते राज्य शासनातर्फे जुलै २०२०आशा वर्कर्स करता २००० व गट प्रवर्तक करता ३००० रू. सुद्धा सप्टेंबर २०२१ पासून पासून कोणताही निधी मिळालेला नाही. जुलै २०२१ पासून आशा वर्कर्स ला १५०० व गट प्रवर्तक यांना१७०० रू. लागू करण्यात आले परंतु तो पन निधी मिळालेला नाही. केंद्र शासनाने आज पर्यंत कोणताही निधी दिलेला नाही
(१) आशा व गटप्रवर्तक यांना कर्मचाऱ्यांच्या दर्जा देऊन किमान समान वेतन देण्यात यावे
(२) हर घर दस्तक व कवच कुंडल सर्व्हेचे काम करून मोबदला देण्यात आलेला नाही तो देण्यात यावा.
(३) एक्सपायरी डेट जवळ आल्यानंतर औषध वाटप जिम्मेदारी आशाला देण्यात येतं ते काम आधीच देण्यात यावे
(४) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दोन हजार वीस पासून शासनातर्फे कोणतीही स्टेशनरी देण्यात आलेली नाही त्याच्या निधी कुठे गेला याची चौकशी करण्यात यावी
(५) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना दर महिन्यात वेळेवर मानधन देण्यात यावे त्याचबरोबर इतर मोबदला सुद्धा वेळेवर देण्यात यावा. या मागणीकरता पोलिओ लसीकरनावर बहिष्कार करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्यातील ४० उत्कृष्ट डॉक्टर्स व समाजरत्न राजभवन येथे सन्मानित राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार प्रदान

Tue Feb 22 , 2022
‘सुभाष सिक्रेट‘ पुस्तकाच्या २१ व्या आवृत्तीचे देखील केले प्रकाशन पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी वैद्यकीय सेवा व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ४० डॉक्टर्स व समाजसेवकांना ‘कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार‘ प्रदान करण्यात आले. पुणे येथील कर्तव्यम सोशल फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला फाउंडेशनचे संस्थापक संतोष बारणे व सचिव क्रांतीकुमार महाजन उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी क्रांतीकुमार महाजन यांनी लिहिलेल्या ‘सुभाष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com