नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत,प्लॉट नं. ५२, ओकार नगर, अजनी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी चेतन अशोक सोरते, वय ३२ वर्षे, हे त्यांचे राहते घरी हजर असतांना, त्यांचे मोबाईलवर अज्ञात आरोपीने फोन करून “वर्क फॉम होम व गुंतवणुकीवर जास्त टक्याने मोबदला देण्याचे आमिष देवुन, फिर्यादीस विश्वासात घेतले आरोपीने दिलेल्या अकाऊंटवर फिर्यादीस वेळोवेळी एकुण १,७०,०००/-रु. टाकण्यास भाग पाडले. आरोपीने फिर्यादीस मुद्दल व नफा यापैकी कोणतीही रक्कम परत न करता, फिर्यादीचा विश्वासघात करून, फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सायबर येथे सपोनि शेळके यांनी आरोपीविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७९, ३४ भादंवि., सहकलम ६६ (ड) आय.टी. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवुन, आरोपींचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.