फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल.

नागपूर :- फिर्यादी संदीप विनायक वंडीवार, वय ५३ वर्षे, रा. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली यांचे मुलाची अॅडमिशन वैद्यकिय शिक्षणाकरीता विदेशात करायची होती. त्यांचे मित्राचे माध्यमातुन इन्फैंट्री एज्युकेशन कन्सल्टन्सी, पाटनकर चौक, जरीपटका, नागपुर बाबत माहीती मिळाली. दिनांक ११.०५.२०१७ च्या १३.०० वा. चे सुमारास फिर्यादी हे नमुद ठिकाणी मुलाचे एडमिशन संबंधाने येवुन नमुद संस्थेचे संचालक आरोपी रवि राजेश बोरकर, रा. दयालु सोसायटी, जरीपटका, नागपुर यांना भेटले, आरोपीने फिर्यादी यांना विदेशात एम.वि.वि.एस. मध्ये मुलाची अँडमिशन करून देण्याची खात्री देवुन त्याकरीता १६,००,०००/- रु. खर्च सांगीतला. फिर्यादीने आरोपीस ३,००,०००/- रु. चा चेक दिला. तसेच, रोख ५००,०००/- रु. दिले. आरोपीने फिर्यादीकडून ८,००,०००/- रु. घेवुन फिर्यादीचे मुलाची अॅडमिशन करून न देता टाळाटाळ करून फिर्यादीने पैसे परत मागीतले असता, पैसे परत न करता फिर्यादीची फसवणुक केली.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्ज चौकशीवरून पो. ठाणे जरीपटका येथे मपोउपनि काळे यांनी आरोपीविरूध्द कलम ४२० भादवि अन्वये गुन्हा नोंदवुन पुढील तपास सुरू आहे..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

Thu Aug 24 , 2023
नागपूर :- दिनांक ०८.०२.२०२३ चे ००.०० वा. ते दि. २२.०८.२०२३ दरम्यान, पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत राहणारी २२ वर्षीय फिर्यादी / पिडीता यांची दोन वर्षांपूर्वी आरोपी विजय पृथ्वीराज ठाकरे, वय २५ वर्षे, रा. कळमना, नागपुर याचे सोबत फेसबुकवर ओळख झाली होती. व त्यांचे आपापसात प्रेमसंबंध जुळले होते. काही कारणास्तव फिर्यादीने आरोपीसोबत संबंध तोडले. या कारणावरून आरोपीने फिर्यादीसोबत काढलेले फोटो व्हॉटस्अॅपव्दारे व्हायरल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com