नागपूर :-दिनांक २२.०५.२०२३ मे १२.४५ वा. ते दि. २३.०५.२०२३ चे १७.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत अवस्थी नगर, प्लॉट नं. २३, नागपूर येथे राहणान्या फिर्यादी मुनिया अलम वय ३३ वर्ष या घरी हजर असतांना आरोपी मो.क्र. ९६९८५५०००४ चा धारक याने फिर्यादीस फोन करून तुमचे पेडेक्सने पार्सल मुंबई वरून तायवान ला जात असून ते कस्टम विभागाने थांबविले आहे असा फोन केला. फिर्यादीने त्यांना मी कोणतेही पार्सल आर्डर केले नाही असे म्हटले असता, आरोपीने फिर्यादीस कस्टम विभागाचे सिनियर अधिकारी अजय सिंग यांचे सोबत बोलण्यास सांगीतले आरोपिनी संगणमत करून फिर्यादीस स्काईप आयडी वरून राजमुद्रा तसेच मुंबई क्राईम ब्राँच सी बी. आय. असे लिहीलेले कागदपत्रे दाखविले व त्यावर ईंडी चा लोगो असल्याचे दाखवून फिर्यादीस भिती दाखवून फिर्यादीचे वेगवेगळ्या बँकेचे खात्यातून एकूण ४,८२,७७८/- रु. ऑनलाईन वळते करून फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलीस ठाणे सायबर येथे आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२० २४६५. ४६७. ४६८, ४७१,३४ भा.दं.वि. सहकलम ६६ (सि) ६६ (डी) माहीती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सपोनि बागुल पोलीस ठाणे सायबर हे करीत आहे.