लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अऱ्याचार करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 12:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील 30 वर्षीय तरुणीशी लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार करून लग्नाचा बनाव करून फसवणुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्यासह एट्रोसिटी चा गुन्हा दाखल केला असून आरोपी चे नाव सुभाष नंदू गंधेवार वय 27 वर्षे रा दाल ओली क्र 1 कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपी ने पीडित तरुणीशी 20-9-2019पासून आजपावेतो कोराडी मंदिर येथे दोन हार घेऊन एकमेकांच्या गळयात हार घालून लग्नाचा बनाव करून दाखवत पीडीतेच्या घरी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थस्पित केले व स्वतःच्या घरी नेण्यास नकार दिला.व दुसऱ्या महिलेशी लग्न करून माझा पीच्चा सोड अशी धमकीवजा देऊन पीडितेची फसवणूक केली यावरून पीडितेच्या तक्रारी वरून सदर आरोपी विरूद्ध भादवी कलम 376(2)एन,420,506 व सह कलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2015 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Next Post

अलंकार नगर येथे 65 हजाराची घरफोडी..

Mon Feb 12 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 12:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अलंकार नगर येथील एका कुलुपबंद घरातुन अज्ञात चोरट्याने अवैधरीत्या प्रवेश करून एम एच 40 ए पी 8262 क्रमाँकाची होंडा शाईन दुचाकी किमती 40 हजार रुपये,संसुई कंपनीची टीव्ही किमती 20 हजार रुपये,होम थिएटर किमती 5 हजार रुपये असा एकूण 65 हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना 10 ते 11 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com