बुट्टीबोरी :- अंतर्गत ०२ कि. मी अंतरावरील जुनी वस्ती बुट्टीबोरी येथे दिनांक १४/०७/२०२३ चे १९.४० वा. पर्यंत फिर्यादी नामे जिवनलाल हरिशंकर तिवारी, वय ४६ वर्ष, रा. जुनी वस्ती बुट्टीबोरी यांनी मोबाईलचे फेसबुकवर प्रिमीयम डि. डि. पावर सेवर मेक्स या प्रोडक्सची अँड पाहीली व प्रोडक्स पसंत आले म्हणून ऑनलाईन ऑर्डर केले. दि. ११/०७/२०२३ ला shiprocket tx-shprkt कंपनी ब्ल्यु डार्ट कंपनी व्दारा फिर्यादीला प्रिमीयम डि. डि. पावर सेवर सेक्स डिलीवरी झाली व फिर्यादीचे ऑडरचे पैसे ६७८/- रू. फोन पे केले. ऑर्डरचा बॉक्स खोलून बघितला तेव्हा प्रोडक्स खराब असल्याचे दिसले म्हणुन न्यु डार्ट कंपनीला कस्टमर केअर क्र. १८६०२३३१२३४ या नंबर फोन लावला व फिर्यादीला जो प्रोडक्स मिळाला तो खराब आहे. म्हणुन प्रोडक्स रिटर्न करायचा आहे. कस्टमर केअरने फिर्यादीला म्हटले कि, मटेरिअल वापस होवून जाईल व पैसे हि वापस होवुन जाईल असे म्हणून फिर्यादीने मोबाईल फोनवर कुरीयर डिटेल्स नावाने लिंक पाठविली. ते लिंक ओपन करून डिटेल्स पाठवायला सांगितले. फिर्यादीने लिंक ओपन करून स्वतःची डिटेल्स लोड करून ऑनलाईन पाठविली थोडया वेळाने मोबाईल वर ओ. टि पी. नंबर आला व फिर्यादीने त्यांना ओ. टि. पी. नंबर सांगितला पुन्हा दुसऱ्या मोबाईल फोन वरून कॉल आला व जो ओ. टि. पी. नंबर बरोबर नाही म्हणुन दुसरा ओ.टि. पो. नंबर पाठवित आहे. फिर्यादीने त्यांना ओ. टि. पी. नंबर सांगितला. व फिर्यादीला म्हणाले की, तुमचे पैसे परत आले आहे ओ.टि. पी. नंबर डिलीट करून टाका. थोडया वेळा नंतर फिर्यादीला समजले कि त्याचे युनियन बँक अकाउंट मधुन २०००००/- रु. व १८४००० /- रू असा एकूण ३८४०००/- रु. विडाल झाले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. बुट्टीबोरी येथे आरोपीविरुध्द कलम ४२० भादंवि सहकलम ६६ डौ माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकुर पोस्टे बुट्टीबोरी हे करीत आहे.
ऑनलाइन फसवणुक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com