नागपूर :- फिर्यादीचा भाऊ नामे चेतन विनोद आने वय २४ वर्ष रा. प्लॉट नं. १७, पाहुणे ले-आउट, पिवळी नदी, यशोधरानगर, नागपूर हा त्याचे मित्रांसोबत कामानिमीत्त भद्रावती येथे गेला होता. परत येतांना तो त्याचा मित्र नामे अमोल राजु झोडापे वय २६ वर्ष याचे सोबत त्याचे स्प्लेंडर मोटरसायकल क. एम.एय. ४९ यी.व्ही १६७८ वर मागे बसुन परत येत असतांना पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत, खापरी चौक समोर, वर्धा रोडवर, फिर्यादीचे भावाला डुलकी लागल्याने चालक अमोल याने त्यास सावरण्याकरीता मागे बघीतले असता त्याचा गाडीवरून तोल जावुन दोघेही रोडने डिव्हायडरला धडकुन गंभीर जखमी झाले. जखमी यांना उपचाराकरीता एम्स हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी फिर्यादीचा भाऊ चेतन विनोद आग्रे यास तपासून त्यास मूत घोषीत केले. अमोल झोडापे याचा उपचार सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी रोहन विनोद आग्रे, वय २२ वर्षे, रा. लॉट नं. १७, पाहुणे ले-आउट, पिवळी नदी, यशोधरानगर, नागपूर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे बेलतरोडी येथे पोउपनि तडवी ९७६४७७६४०९ यांनी स्प्लेंडर चालक आरोपीविरूध्द कलम २७९, ३३८, ३०४(अ) भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.