प्रतिबंधीत तंबाखू विक्री व हुक्का पार्लर चालविणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

– गुन्हेशाखा युनिट क. १ पोलीसांची कामगिरी 

नागपूर :- दिनांक ०२.०८.२०२३ चे ०९.२० वा. चे सुमारास गुन्हेशाखा युनिट १ चे अधिकारी व अमलदार हे पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत पेट्रोलींग करीत असतानां क्यूबा स्पोर्टस कॅफे लॉज, लक्ष्मी भवन चौक, गोतमारे कॉम्प्लेक्स, दुसरा माळा, धरमपेठ, नागपूर येथे अवैध हुक्का पार्लर चालू आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून नमुद ठिकाणी रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी अफराज आसिफ अनडाला वय २३ वर्ष रा. कावरापेठ,रेल्वे, रामसुमेर बाबा नगर, शांतीनगर, नागपूर हा शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ हे वेगवेगळा फ्लेवरचे तंबाखु, हुक्का इत्यादी साहित्य ग्राहकांना पुरवून विक्री करतांना मिळून आला. त्याचे ताब्यातुन ६ नग हुक्का पॉट, फ्लेवर तंबाखु, इतर साहित्य असा एकुण ८,६५०/- रु चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे सिताबर्डी येथे कलम ४, २९ सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरन यांचे विनीयमन) अधिनीयम २००३ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शना खाली पोनि सुहास चौधरी, पोहवा सुमीत गुजर, नापोअ चंद्रशेखर भारती यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक, २,७०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त

Wed Aug 2 , 2023
नागपूर :- दिनांक १९.०७.२०२३ चे २३.०० वा. चे दरम्यान फिर्यादी रिजवान अहमद अब्दुल रहमान वय ४८ वर्ष रा. लेंडी तलाव, पाचपावली हे पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत टिपू सुलतान चौक, संघर्ष नगर येथे त्यांचे सासर यांचे घरी आपले स्प्लेंडर क. एम.एच. ३१ डि.एम ५०३२ ने गेले व गाड़ी लॉक करून ठेवली असता. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची मोटरसायकल चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!