नितीन लिल्हारे, प्रतिनिधी
मोहाडी : तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव/धुसाळा ग्रामपंचायतचे सरपंच रामकृष्ण पुंडे यांच्या सांगण्यावरून रस्त्यावरील खांबावर पथदिवे लावत असतांना खांबावरील विजेच्या ताराला हाताचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जबर धक्का बसल्याने त्याचा खांबावरच जागीच मृत्यू झाल्याची ही घटना आज दुपारी एक वाजेदरम्यान घडली.
सुंदरलाल यादोराव कटरे ३२ वर्ष रा. नवेगाव असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. हा सरपंच पुंडे याच्या सांगण्यावरून ग्रामपंचायतीचे रोजंदारीवर पथदिवे लावण्याचे काम करायचा. मात्र सरपंच रामकृष्ण पुंडे व मृतक हे कोणत्याही प्रकारचे महावितरण विभागाला सूचना न देता मनमर्जी प्रमाणे काम करायचे?
हा व्यक्ती नेहमी प्रमाणे ग्रामपंचायतीचे पथदिवे लावण्याचा कार्य वीज प्रवाह सुरू असतांनाच अनेक दिवसांपासून करीत होता. पथदिवे लावतांना वीज कार्यालयाला त्याची सूचना देण्यात येत नव्हती अशी चर्चा सुरू आहे.
आज दुपारी एक वाजेच्या सुमारास हे कार्य करीत असतांनाच त्याला विजेचा जबर धक्का बसून त्याचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती होताच गावात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. सरपंच यांच्या हलगर्जीपणामुळे युवकांचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.
ग्रामपंचायतने मृतकच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.या प्रकरणाचा तपास ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्या मार्गदर्शनात पोह. नवनाथ शिदने, गणेश मते, नितीन तळवेकर, अमोल मस्के हे करीत आहेत.