जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

केळवद :- पोस्टे केळवद येथील स्टाफ पोस्टे परीसरात सरकारी वाहनाने पेट्रोलींग करीत असता मुखबिरव्दारे खबर मिळाली कि, छिंदवाडा ते नागपुर रोड ने झायलो गाडी क्र. एम एच ०४/जी डी-१९७२ मध्ये अवैधरित्या कत्तलीकरीता गौवंश जनावरांची वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या खबरे वरून जैतगढ़ शिवारातील आर टी ओ बरेल येथे पोहचुन नाकाबंदी करीत असतांना छिंदवाडा (एम पी) कडुन एक झायलो गाडी एम एच -०४/जी डी-१९७२ हे नाकाबंदीचे ठिकाणी येताना दिसली. त्याला पोलिस स्टाफ सह नाकाबंदीचे ठिकाणी थांबवण्याचा इशारा केला असता झायलो गाडी एम एच ०४/ जी डी-१९७२ चे चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवुन नाकाबंदीचे ठिकाणी न थांबवता नागपुरच्या दिशेने २०० मिटरवर जाउन रोडच्या बाजुला आपले वाहन उभे केले व पोलिस स्टॉफ त्या ठिकाणी जाईपर्यंत सदर वाहन चालक हा जंगली झाडीझुडपाचा फायदा घेउन पळून गेला.

सदर झायलो गाडी क्र. एम एच ०४/जी डी-१९७२ किंमती ५,००,०००/-रू. ची पाहणी केली असता त्यामध्ये कोणीही व्यक्ती मिळुन आली नाही. सदर झायलो क्र. एम एच ०४/ जी डी-१९७२ चे दार उघडुन मागील बाजुस पाहणी केली असता त्या मध्ये १) ०२ नग लाल रंगाचे जर्सी गाईचे कालवड गौवंश किंमती २०,०००/-रु. २) ०२ नग काळया पांढ-या रंगाची जर्सी गाय किंमती ४०,०००/- रू. ३) ०२ नग लाल रंगाची जर्सी गाय किंमती ४०,०००/-रु. ४) ०१ नग कोस्या रंगाची जर्सी गाय किंमती २०,०००/- रू ५) एक पांढ-या रंगाची गाय किमंत १५०००/- रू असे एकून १,३५,०००/- रू चे गोवंश जनावरे यांना अत्यंत कुर व निर्दयतेने वाहनात डांबुन आखुड दोरीने पाय व तोंड बांधुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपु-या जागेत कोंबुन वाहतुक करीत असल्याचे मिळून आल्याने आरोपींच्या ताब्यातून १,३५,०००/- रू चे गोवंश जनावरे व झायलो गाडी क्र. एम एच -०४/जी डी-१९७२ किंमती ५,००,०००/- रू. असा एकुण ६,३५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या गोवंश जनावरांना पुढील देखभाल व उपचाराकरीता शेठ रामलाल मालु गौशाळा कवठा ता. सावनेर येथे दाखल करण्यात आले आहे.

फिर्यादीचे लेखी रिपोर्टवरून पोलिरा स्टेशन केळवद येथे कलग २७९ भादवि रात कलग ११ (१) (4) (3) (4) प्राण्यांना निर्दयतेने वागवणे प्रति अधिनियम १९६० सहकलम ५ (अ) ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि १९९५ सहकलम ११९ मपोका सहकलम १८४ मो.वा.का प्रमाने गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही ही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.), रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा),  अनिल महस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राकेश साखकर ठाणेदार पोलिस स्टेशन केळवद, पोहवा दिनेश काकडे, पोहवा सुधीर यादगिरे, नापोशि होमेश्वर खडसे पोशि धोंडुतात्या देवकते, पोशि सचिन सलामे यांनी केली. पुढील तपास पोहवा दिनेश काकडे हे करत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपविभागीय पोलीस अधिकारी नागपुर विभाग नागपुर ग्रामीण यांची जुगार खेळणाऱ्यावर धडक कार्यवाही

Wed May 29 , 2024
नागपूर :-  उपविभागीय पोलीस अधिकारी नागपुर विभाग नागपुर ग्रामीण यांचे पथकाकडुन अवैद्य जुगार खेळणारे लोकांवर कार्यवाही करण्यात आली असून सदर कार्यवाही मध्ये एकूण १४,४८,५६०/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला. गोपनिय बातमीदारद्वारे खात्रीलायक खबर मिळालेवरून उपविभागीय पोलीस अधिकारी नागपुर विभाग नागपुर ग्रामीण यांनी पो.स्टे. बु‌ट्टीबोरी हद्दीतील मौजा खरसोली शिवारात ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या लोकांवर लपत छपत घेराव करून छापा कार्यवाही केली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com