नागपूर :-दिनांक ०४.११.२०२३ चे ०६.२० वा. चे सुमारास गुन्हे शाखा युनिट ५ चे अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमीदाराचे मिळालेल्या खात्रीशिर माहिती करून सापळा रचुन पोलीस ठाणे कपिलनगर ही क्वार्टर क. बी/४१, एन.आय.टी. क्वार्टर, कपिलनगर येथे रेड कारवाई केली असता अँटोरिक्षाचालक अतुल विजय भालाघरे वय ३७ वर्ष ग. प्लॉट नं. १०१, समता नगर, अंजनीपुत्र ले-आउट, कपिलनगर, नागपूर याने ताब्यातुन जॉनी वॉकर, १०० पायपर, जि.ए. इंपीरीअल तसेच कॅमीनो, सिमरन ऑफ अॅब्सुलेट वोडका व स्कॉच की तसेच ईतर विवीध कंपनीचे वेगवेगळया ब्रँडचे विदेशी दारूचा अवैधरित्या साठा एकुण २,४९,७२०/- रु चा मुद्देमाल मिळून आला. आरोपीला मुद्देमालाबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने नमुद अवैध स्साठा हा पाहिजे आरोपी नामे अशोक पंमल चेलानी, वय ४२ वर्ष, रा. चांदुराम मठाजवळ जरीपटका, नागपूर याचा असल्याचे सांगीतले. आरोपीला विश्वासात घेवून बारकाईने विचारपूस केली असता स्थान सांगीतल्या प्रमाणे रेड कारवाई करून गोंडवाना चौक, सदर येथील एका फ्लॅट मधुन अवैध विदेशी दारूचा साठा किमत ३०,४४,२१०/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच कॉटन मार्केट, गणेशपेठ येथील एका कुलरचे दुकानातून अवैध विदेशी दारूचा साठा वेगवेगळे ब्रड किमत ७,३१,७६०/- या मिळून आला. आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे कपिलनगर येथे कलम ६५ (ई) म.दा. का अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीचे ताब्यातुन अवैधरित्या विदेशी दारूचा साठा व अँटोरिक्षा एकूण किमती ४१,६४,०१० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील कार्यवाहीस्तव कपिलनगर पोलीसांचे ताब्यात दिलेले आहे. पाहिजे आरोपीचा शोध सुरू आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. राहुल शिंरे, सपोनि विकांत धारकर, पंकज भोपळे, पोउपनि राहुल रोटे, आशिष ठाकुर, आशिष कोहळे, सफी राजेश लोही पोहवा रोलॉड अन्थोनी, प्रमोद वाघ, रामनरेश यादव, रामचंद्र कारेमोरे, राजुसिंग राठोड, महादेव थोटे, भिमराव बांबल, गौतम रंगारी, सुशिल श्रीवास, नापोअ टप्पूलाल चुटे, निखील जामगडे, राजेन्द्र टाकळीकर पोअ, अमोल भक्ते आशिष पवार, सुधिर तिवारी, सुशिल गवई, सचिन यांनी केली.