पोलीस स्टेशन कोंढाळी :- अंतर्गत राजलक्ष्मी सभागृहाचे मागे आर्शिवाद नगर नागपुर ५० कि मी पूर्व यातील फिर्यादी चे लग्न सन २०२० मध्ये आरोपी नामे- फिरोज पठाण सोबत जाती रितीरिवाजाप्रमाणे झाले असुन, लग्न झाले तेव्हा पासुन फिर्यादी चे माहेरी जावुन वारंवार पैशाची, सोन्याची व सामानाची मागनी केली असता, फिर्यादीने त्याची मागणी पूर्ण केली नसल्याने यातील आरोपी नामे- १) फिरोज पठाण २) सईदा पठान ३) इरशाद पठान ४) राजिक पठाण सर्व रा. राजलक्ष्मी सभागुहाचे मागे नगर नागपुर यांनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करून मारहान करून, देवुन शारीरीक व मानसिक त्रास देवुन घराबाहेर काढले.
सदर प्रकरणी फिर्यादी पिडीतेचे रिपोर्टवरून पो.स्टे. कोंढाळी येथे आरोपीविरूध्द कलम ४५८ (अ) २९४, ३२३, ५०४, ५०६,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सफी तांदुळकर पो स्टे कोंढाळी हे करीत आहे.