मिरची पावडर डोळ्यात टाकुन दागिने घेवून फरार आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

एमआयडीसी बोरी :- अंतर्गत यातील फिर्यादी हे दि.०२/१२/ २०२३ रोजी ०९.२५ वा.आपले ज्वेलरी शॉप बंद करून दुकानातुन सोन्या चांदीचे दागीने व कॅश असलेली बॅग सोबत घेवुन कार ने परत जात असतांना खापरी मोरेश्वर रोडवर समोरून एक स्कुटी चालक आला व त्यांनी फिर्यादीच्या कारला धडक दिली व खाली पडला त्यांचे मदतीला फिर्यादी कार मधुन बाहेर आले असता, टाकळघाटच्या दिशेने एक स्कूटीस्वार आला व त्याने फिर्यादीच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून दोघानी रोडच्या खाली धकलून दिले व फिर्यादीच्या कारमध्ये ठेवलेल्या ज्वेलरीचे बॅग काढून पळून गेले ज्यात सोन्या चांदीचे व रोख रक्कम मिळून एकूण २८,११,३२०/रू चा माल होता.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे-अतुल रामकृष्ण सेरेकर वय ३६ वर्ष रा. खापरी मोरेश्वर ता. हिंगणा जि. नागपुर यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथे अज्ञात आरोपीविरुभ्ट कलम ३९४,३४ भादवी. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि रॉय, हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणा-या आरोपीवर कारवाई

Mon Dec 4 , 2023
खापरखेडा :- अंतर्गत मौजा नगरधन, यातील फिर्यादी पिडीता व आरोपी नामे-बचन भगवानदास युवनाते वय २४ वर्ष राहणार चिंचोली बाबुळखेडा खापरखेडा यांच्यात पूर्वी प्रेम संबंध होते. फिर्यादी पिडीता हिने आरोपी सोबत संबंध तोडल्याने आरोपीने फिर्यादीस वारंवार फोन करून माझ्यासोबत बोल व मला भेटायला ये, असे बोलून दिनांक ०२.१२.२०२३ चे १७.३० ते १८.०० वा दरम्यान, पिडीताला भेटायला बोलवून तिचे सोबत लज्जास्पद बोलुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com