प्राणांकीत अपघात करणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत विनोबाभावे नगर  कळमणा पुलाकडे पायदळ जाणारे देवदास गुलाबराव धेटे वय ४० वर्ष रा. कुंदनलाल गुप्ता नगर, यशोधरानगर यांना रोड क्रॉस करीत असता आरोपी एका लाल रंगाचे कार चालकने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक मारून गंभीर जखमी करून पळून गेला. जख्मी यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल वार्ड क्र. ३९ येथे दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारादरम्यान दि. १५.०६. २०२३ चे ०२.१५ वा. तपासून मृत घोषीत केले.

याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सुचनेवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे पोउपनि पारोडे यांनी आरोपी वाहन चालकाविरुध्द कलम ३०४(अ) २७९, भा. दं. वी कलम १३४, १७० मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Mon Nov 6 , 2023
नागपूर :- पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत सुभाष रोड, कॉटन मार्केट, सैगेरीस इम्पैक्स कंपनी येथील आरोपी १) सुजाता मालेवार वय ३८ वर्ष २) साईकुमार जयकांत जयस्वाल दोन्ही रा. सुभाष रोड, कॉटन मार्केट यांनी संगणमत करून फिर्यादी दुर्गेशकुमार श्रीगोपाल नागोरी वय ५३ वर्ष रा. २२, क्यून्स क्लोज, युनिट १२/१५७, सिंगापूर यांचे सोबत कार्यालयातून सोयाबीन व्यापाराबाबत २१० मॅट्रीक टन सोयाबीन भारतीय चलनात किमत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com