कन्हान :- परिसरातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय महा मार्गावरील तार कंपनी टेकाडी जवळ अज्ञात बस चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन कारला मागुन जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात कार पलटी होऊन मोठे नुकसान होऊन कारमधिल महिला सोनाली येनुलकर जख्मी झाल्याने पो लीसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीने पोस्टे कन्हान ला अज्ञात बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.३) डिसेंबरला दुपारी १ वाजता दरम्यान सोनाली विलासराव येनुलकर वय ३१ वर्षे राह. तळेगाव काकड धरा, वर्धा हे आपल्या पती विलासराव येनुलकर व मुलगा सोबिन आणि पती विलासराव यांचे मित्र राजु किसनराव कूटे त्यांची पत्नी माधुरी, मुलगा व लहान मुलगी असे मिळु न सोनाली यांच्या कार क्र एम एच ४३ ए डब्लु- १०१५ ने टिमकी नागपुर येथे असलेल्या परमात्मा एक च्या निवासस्थानी दर्शना करीता गेले. तेथुन दर्शन करून सोनाली व त्यांचे कुटुंब सहकारी परमात्मा एक भवन वर्धमान नगर नागपुर येथुन अंदाजे ५.३० वाजता दरम्यान सोनाली यांचे माहेर खंडाळा डूमरी येथे जाण्या करीता निघाले असता सायंकाळी ७ च्या सुमारास नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गाने जात असतांना तार कंपनी टेकाडी जवळ एका अज्ञात बसच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळ जीपणे चालवुन सोनाली यांच्या कारला मागुन जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात सोनाली यांची कार पलटी होत मोठे नुकसान होऊन सोनाली ही जख्मी झाल्याने माहुरे हॉस्पीटल कामठी येथे आय सी यु विभागात उपचार घेत आहे. सोनाली यांच्या सोबत असलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारची जख्म किंवा दुखापत झालेली नसल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे प्राथमिक उपचार करण्यात आला. कन्हान पोलीसांनी फिर्यादी सोनाली येनुलकर यांच्या तक्रारीने पोस्टे ला अज्ञात बस चालका विरुद्ध कलम २७९, ३३८ भादंवी सह कलम १८४, १३४ (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.
@ फाईल फोटो