आजनी येथील शेतात वीज पडून एक बैल ठार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी, ता.४ : शेतमजूर बैलबंडीने घराकडे जाण्याकरीता निघाला असतानाच अचानक वीज पडल्यामुळे वखराला बांधलेला एक बैल घटनास्थळीच दगावला. मात्र यात सुदैवाने शेतमजूर व एक बैल बचावला आहे. ही घटना गुरुवार (ता.४) रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील आजनी शिवारात घडली.

नितीन कृष्णराव रडके (रा. आजनी) यांची कामठी लगतच्या आजनी शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतीला लागून रघुनाथ रडके यांची शेती आहे गुरूवारी नितिन रडके यांची बैलजोडी घेऊन रघुनाथ रडके त्यांच्या शेतातील मजूर शेतात वखरणीचे काम करत असताना अचानक दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे त्या मजूराने पावसाचा जोर वाढल्याने आडोश्याला असलेल्या झोपडीत जाण्याची तयारी चालविली. दरम्यान, मजूर मागे फिरत झोपडीत जात नाही तेवढ्यात कडकडणारी वीज वखराला जुंपलेल्या बैलजोडीच्या एका बैलावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा बैल मात्र सैरावैरा पळत सुटला. त्या शेतमजूराला कुठलीही दुखापत झाली नसली तरी, डोळ्यादेखत झालेल्या या घटनेमुळे त्याला जबर मानसिक धक्का बसला आहे. त्याने घटनेची माहिती शेतमालकाला दिली माहिती मिळताच, शेतमालकाने घटनास्थळी दाखल होत गावचे पोलीस पाटील बळवंतराव रडके व कोतवाल राजू लायबर यांना माहिती दिली. तहसीलदार अक्षय पोयाम यांनी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा व अहवाल सादर करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या असता तलाठी तिजारे मॅडम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून अहवाल पुढील कारवाईस सादर केला. शेतमालकाचे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्हास्तरीय १७ वी आष्टे-डू मर्दानी आखाडा स्पर्धेत पारशिवनी तालुका अव्वल

Thu Aug 4 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी शिवा अखाडा खेडी ११,नवयुवक अ.खेडी ११, जगदंबा अ.बोरी८,परमात्मा अ.निमखेडा५ पदक.   कन्हान : – आष्टेडू मर्दानी अखाडा असोशियशन व्दारे १७ वी जिल्हास्तरिय आष्टेडू शिवकालीन शास्त्रविद्या स्पर्धेत पारशिवनी तालुक्यातील अखाडा मंडळाने १३ सुवर्ण, १४ रजत व ८ कास्य असे ३५ पदक मिळवित जिल्हयात पारशिवनी तालुक्याने अव्वल स्थान पटका विले आहे. रामटेक येथे (दि.३१) जुलै ला आष्टेडू मर्दानी अखाडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com